‘हा’ सरकारी शेअर देईल 372% रिटर्न? तज्ज्ञांनी खरेदीसाठी दिला हिरवा सिग्नल
NTPC Share Price Today
NTPC Share Price Today : भारतीय शेअर बाजारात गुरुवारी मोठी घसरण नोंदवली असली, तरी एनटीपीसी लिमिटेड या सरकारी ऊर्जा क्षेत्रातील दिग्गज कंपनीच्या शेअरबाबत बाजारातील तज्ज्ञांचा सुर सकारात्मक राहिला आहे. बाजारात मोठा उतार असूनही या शेअरकडे गुंतवणूकदार आणि विश्लेषकांचे विशेष लक्ष लागले आहे. कारण या शेअरने गेल्या काही वर्षांत 372% पर्यंत जबरदस्त परतावा दिला आहे.
हे पण वाचा : रिलायन्स पॉवर शेअर लोअर सर्किटला आदळला, गुंतवणूकदारांनी आता काय करावं?
आजच्या ट्रेडिंग सत्रात बीएसई सेन्सेक्स तब्बल 512 अंकांनी घसरून 82213.81 वर बंद झाला, तर निफ्टी 148 अंकांनी घसरून 25071.35 वर आला. आयटी आणि बँकिंग क्षेत्रात मोठी विक्री दिसून आली. निफ्टी आयटी निर्देशांक 746 अंकांनी घसरून 36205 वर पोहोचला, तर निफ्टी बँक 296 अंकांनी घसरून 56914 वर आला. अशा नकारात्मक वातावरणातही एनटीपीसी लिमिटेडचा शेअर फक्त 0.87% इतकाच घसरला, हे विशेष लक्षात घेण्याजोगं आहे.
गुरुवारी एनटीपीसी शेअर 343.60 रुपयांवर ओपन झाला होता आणि ट्रेडिंगदरम्यान 339.70 ते 343.60 रुपयांच्या रेंजमध्ये राहिला. सध्या हा स्टॉक 340.10 रुपयांवर ट्रेड करत आहे. शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 448.45 रुपये आणि नीचांकी 292.80 रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप जवळपास 3.29 लाख कोटी रुपयांच्या घरात पोहोचले आहे.
विशेष म्हणजे, काही प्रमुख ब्रोकरेज फर्म्सनी या शेअरबाबत खरेदीचा सल्ला दिला असून, आगामी काही तिमाहींत एनटीपीसीचा परफॉर्मन्स आणखी भक्कम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कंपनीचा उत्पादन क्षमता विस्तार, ग्रीन एनर्जी प्रकल्पांमध्ये मोठी गुंतवणूक आणि देशातील वाढत्या वीज मागणीचा फायदा यामुळे या शेअरमध्ये दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी असल्याचे मत तज्ज्ञांनी मांडले आहे.
हे पण वाचा : सरकारी कंपनीचा धमाका! NHPC शेअरने दिले 428% रिटर्न, CLSA कडून टार्गेट आणि रेटिंग जाहीर
विश्लेषकांच्या मते, एनटीपीसीचा टार्गेट प्राईस 410 रुपये ते 450 रुपयांदरम्यान असू शकतो. काही आंतरराष्ट्रीय संस्थांनी तर पुढील वर्षभरात हा शेअर 500 रुपयांच्या पार जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे सध्याच्या घसरणीच्या काळात दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एनटीपीसी हा एक विश्वासार्ह पर्याय ठरू शकतो.
