October 31, 2026

पटेल इंजीनियरिंग शेअरमध्ये मोठी संधी; वाचा तज्ज्ञांचा मोठा सल्ला

0
Patel Engineering Share Price Today

Patel Engineering Share Price Today

Patel Engineering Share Price Today : भारतीय शेअर बाजारात गुरुवारी मोठी घसरण झाली असली, तरी काही मिड-कॅप कंपन्यांचे शेअर्स गुंतवणूकदारांच्या रडारवर आहेत. विशेषतः पटेल इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीचा शेअर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सध्या अवघ्या 38.99 रुपयांवर उपलब्ध असलेल्या या शेअरमधून तब्बल 69 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

हे पण वाचा : ‘हा’ सरकारी शेअर देईल 372% रिटर्न? तज्ज्ञांनी खरेदीसाठी दिला हिरवा सिग्नल

आजच्या सत्रात, म्हणजे २४ जुलै रोजी, शेअर बाजार उघडताच पटेल इंजिनिअरिंगचा शेअर 39.12 रुपयांवर ट्रेडिंगला सुरूवात करत, 39.30 रुपयांचा उच्चांक गाठला. त्याच वेळी शेअरचा दिवसाचा निच्चांकी स्तर 38.85 रुपये इतका राहिला. दिवसभरात मोठी चढउतार नसतानाही गुंतवणूकदारांनी या शेअरमध्ये रस दाखवला आहे. या कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 3,291 कोटी रुपयांच्या घरात आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून शेअर बाजारात अस्थिर वातावरण आहे. सेन्सेक्स गुरुवारी तब्बल 534 अंकांनी घसरून 82,192.18 वर बंद झाला. निफ्टीतही 148 अंकांची मोठी घसरण झाली. आयटी आणि बँकिंग निर्देशांकातही कमकुवतपणा दिसून आला. मात्र, अशा घसरणीच्या काळातही पटेल इंजिनिअरिंगसारखा स्टॉक स्थिरतेने टिकून आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या आशा या शेअरवर टिकून आहेत.

पटेल इंजिनिअरिंगचा गेल्या ५२ आठवड्यांतील उच्चांक 62.80 रुपये इतका असून, नीचांकी दर 35.68 रुपये इतका राहिला आहे. त्यामुळे सध्याचा भाव पाहता हा शेअर अजूनही आपल्या टॉप लेव्हलच्या तुलनेत स्वस्त मानला जात आहे. त्यातच, ब्रोकरेज संस्थांकडून या शेअरच्या भविष्याबाबत सकारात्मक संकेत मिळत आहेत. काही विश्लेषकांच्या मते, येत्या काही महिन्यांत या शेअरची किंमत 65 ते 66 रुपयांपर्यंत जाऊ शकते. म्हणजेच, सध्याच्या दराच्या तुलनेत गुंतवणूकदारांना जवळपास 69% परतावा मिळू शकतो.

हे पण वाचा : रिलायन्स पॉवर शेअर लोअर सर्किटला आदळला, गुंतवणूकदारांनी आता काय करावं?

या मागे कंपनीचा मजबूत ऑर्डर बुक, विविध पायाभूत प्रकल्पांत सहभाग, आणि वित्तीय शिस्तीचा मोठा वाटा आहे. इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील वाढत्या संधींचाही या कंपनीला फायदा होताना दिसत आहे. मात्र, याचबरोबर तज्ज्ञ असा इशाराही देतात की मिड-कॅप शेअर्समध्ये असलेली अस्थिरता आणि प्रकल्प पूर्णतेवरील अवलंबित्व लक्षात घेऊन गुंतवणूक ठरवावी.

Leave a Reply