‘हा’ सरकारी शेअर गाठणार नवा उच्चांक? 34% अपसाईडची शक्यता, जाणून घ्या तज्ज्ञांचं मत
IFCI Share Price
IFCI Share Price : मुंबई शेअर बाजारात आज जोरदार तेजी पाहायला मिळाली. मंगळवार, 15 जुलै 2025 रोजी ट्रेडिंगच्या पहिल्याच सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीने दमदार उसळी घेतली असून गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर उत्साहाचे भाव दिसून आले. याच दरम्यान, बाजारात एका कमी दराच्या पण मोठी कमाई करून देणाऱ्या शेअरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या शेअरबाबत तज्ज्ञांनी दिलेला सल्ला आणि दिलेले टार्गेट प्राईस पाहता, गुंतवणूकदारांसाठी ही एक मोठी कमाईची संधी असू शकते.
हे पण वाचा : फक्त ₹15 मध्ये हा पेनी स्टॉक! 17% रिटर्नची संधी, तज्ञांचं लक्ष ‘या’ शेअरवर
आईएफसीआय लिमिटेड या सार्वजनिक वित्तीय संस्थेच्या शेअरमध्ये आज सौम्य वाढ झाली असली, तरी त्यामागचा तज्ज्ञांचा विश्लेषण अधिक महत्त्वाचं ठरतंय. कंपनीचा शेअर आज 0.68% वधारून 63.34 रुपयांवर पोहोचला. ट्रेडिंग सुरू होताच हा स्टॉक 63 रुपयांवर उघडला होता. दिवसाच्या व्यापारात त्याने 64.40 रुपयांचा उच्चांक गाठला, तर 62.55 रुपये हा निचांक ठरला.
या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 91.40 रुपये असून नीचांक 36.20 रुपये इतका आहे. म्हणजेच सध्याच्या बाजारभावावरून पाहता या शेअरमध्ये अजूनही तब्बल 34% पर्यंत अपसाईड म्हणजेच वाढीची संधी शिल्लक आहे.
आर्थिक तज्ज्ञांच्या मते, सरकारी पुनर्रचना आणि औद्योगिक वित्तपुरवठा क्षेत्रातल्या गरजा लक्षात घेता IFCI पुढील तिमाहीत चांगले निकाल देऊ शकते. काही विश्लेषकांनी या शेअरचे टार्गेट प्राईस 85 रुपये ते 90 रुपये दरम्यान असल्याचं भाकीत केलं आहे.
या पार्श्वभूमीवर अल्प किंमतीचा हा शेअर मध्यम ते दीर्घ मुदतीसाठी चांगला पर्याय ठरू शकतो. त्यातही सरकारी मालकी असलेल्या कंपनीचे शेअर्स सुरक्षित गुंतवणुकीसाठी विचारात घेतले जातात.
हे पण वाचा : बाबा वेंगाचे जगाला हादरवणारे भाकीत! असा विषाणू येणार की….
सध्या आयएफसीआयचं मार्केट कॅप सुमारे 17,000 कोटी रुपये असून संस्था विविध वित्तपुरवठा प्रकल्पांमध्ये सक्रिय आहे. कर्जवाटप, पुनर्वित्तीकरण, आणि सरकारी धोरणांना पाठिंबा देणारे आर्थिक उपक्रम या संस्थेच्या कामकाजाचा गाभा आहे.
अर्थव्यवस्थेत सुधारणा आणि गुंतवणूक वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर अशा कंपन्यांमध्ये वाढीची संधी अधिक असते. त्यामुळे अल्प दराचा हा शेअर आपल्या पोर्टफोलिओमध्ये स्थान देण्यासारखा आहे, असं अनेक विश्लेषकांचं मत आहे.
