October 30, 2026

पावसाळ्यात डास-मच्छरचा धोका टाळा? घरच्या घरी बनवा ‘हा’ नॅचरल मॉस्किटो स्प्रे; लहान मुलांसाठीही एकदम सुरक्षित!

0
Punelive24 News

पावसाळा सुरु होताच डास आणि माश्यांचा उपद्रव प्रचंड वाढतो. हे किडे केवळ त्रासदायकच नाहीत, तर अनेक रोगांचं कारणही बनतात. बाजारात मिळणारे रासायनिक स्प्रे आणि कॉइल्स काही वेळ उपयोगी ठरतात, पण त्यांचा दिर्घकाळ वापर आरोग्यास हानी पोहचवू शकतो, विशेषतः लहान मुलांसाठी. या लेखात आपण एक घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. केवळ 3 वस्तूंनी तयार होणारा नैसर्गिक आणि प्रभावी मॉस्किटो रिपेलंट स्प्रे कसा बनवावा, त्याबाबत पाहुयात-

पावसाळ्याच्या दिवसात उष्णता, दमट हवामान आणि साचलेले पाणी माश्या व डासांच्या प्रजननासाठी अत्यंत अनुकूल असतात. हे कीटक डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या आजारांचे मुख्य वाहक आहेत. त्यामुळे त्यांना वेळीच आळा घालणं गरजेचं असतं.

मॉस्किटो स्प्रे ‘असा’ बनवा

डासांना दूर ठेवण्यासाठी सर्वोत्तम नैसर्गिक पर्याय म्हणजे कडुलिंबाचं तेल आणि लिंबाचा रस, या रसमध्ये असणारे सायट्रिक अ‍ॅसिड डास-माश्यांना सहन होत नाही. त्याचबरोबर कापूर याचा गंध कीटकांना दूर ठेवतो. या तीन गोष्टी वापरुन तुम्ही स्प्रे बनवू शकता.

यासाठी सर्वप्रथम एक रिकामी स्प्रे बाटली घ्या. त्यात 2 चमचे कडुलिंबाचं तेल टाका. नंतर 1 चमचा लिंबाचा रस घाला. 2 कापूर गोळ्या बारीक करून त्या पावडर स्वरूपात त्यात टाका. शेवटी 200 मि.ली. पाणी घाला. बाटली झाकून ती नीट हलवा, जेणेकरून सर्व घटक चांगले मिसळतील.

कसे वापरावे?

स्प्रेला प्रत्येक वेळी वापरण्यापूर्वी नीट हलवा. डास आणि माश्यांची संख्या जास्त असणाऱ्या जागांवर – उदा. खिडक्या, दरवाजे, अंधारे कोपरे – इथे स्प्रे करा. झोपण्यापूर्वी खोलीत फवारणी केल्यास संपूर्ण रात्र त्रासमुक्त जाईल.

हा घरगुती उपाय पूर्णपणे नैसर्गिक घटकांपासून बनलेला असल्याने तो मुलांसाठी आणि प्राण्यांसाठीही सुरक्षित आहे. बाजारातील रासायनिक स्प्रे वापरण्यापेक्षा हा घरगुती उपाय नक्कीच फायदेशीर ठरू शकतो.

Leave a Reply