June 15, 2026

आज प्रवास टाळा! या राशींसाठी धोका; कोणाला मिळणार गोड बातमी?

0
Horoscope Today

Horoscope Today

Horoscope Today : ज्योतिषशास्त्रानुसार ३१ जुलै २०२५ हा दिवस काही राशींना उत्तम संधी देणारा, तर काहींसाठी सावधगिरी बाळगण्याचा आहे. आजच्या दिवशी ग्रह-नक्षत्रांच्या हालचाली अनेकांच्या जीवनावर परिणाम करणार आहेत. काहींना परदेशगमनाची संधी मिळेल, काहींना नोकरी-व्यवसायात यश, तर काही राशींनी आज प्रवास टाळणं अधिक चांगलं ठरेल. जाणून घ्या तुमचं आजचं संपूर्ण राशीभविष्य…

हे पण वाचा : अमेरिकेची धमकी आणि भारतात बाजार कोसळतोय! ट्रम्प टॅरिफचा दणका सुरू

मेष: आज आनंददायी बातमी मिळण्याची शक्यता आहे. कामात व्यग्र राहाल आणि सामाजिक मान-प्रतिष्ठा वाढेल. एखाद्या प्रिय व्यक्तीची भेट होऊन दिवस खास बनेल.

वृषभ: परीक्षा, स्पर्धा किंवा नोकरीच्या बाबतीत शुभ योग आहे. जुन्या वादातून सुटका होऊ शकते. नवीन जबाबदाऱ्या पेलण्याची क्षमता तुमच्यात आहे.

मिथुन: उत्पन्नाच्या तुलनेत खर्च वाढण्याची शक्यता आहे. निर्णय घेताना शांत डोक्याने विचार करा. भागीदारीपासून दूर राहा आणि शेवटचा निर्णय स्वतः घ्या.

कर्क: व्यवसायात वाढीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. परदेश प्रवासाची इच्छा पूर्ण होऊ शकते. कुटुंबात शुभकार्याचा योग संभवतो.

सिंह: आज प्रवास टाळा. प्रवासादरम्यान दुखापत होण्याचा धोका आहे. कामात जबाबदाऱ्या कमी होऊ शकतात. तणावग्रस्त वातावरण टाळा.

कन्या: नोकरी व व्यवसायात प्रगतीचा दिवस. सरकारी कामकाजात यश मिळेल. घरात सौख्यवृद्धी होईल. नवीन घर घेण्याचा विचार पूर्ण होईल.

तुळ: सहलीला जाण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने अभ्यास करावा. कामाच्या ठिकाणी संयम बाळगा.

वृश्चिक: वडिलोपार्जित मालमत्तेचा लाभ होण्याची शक्यता. दूर देशात गेलेली प्रिय व्यक्ती परत येऊ शकते. संगीत किंवा कला क्षेत्रातील व्यक्तींना फायदा होईल.

धनु: तुमच्या बोलण्यात जादू आहे, राजकारणात त्याचा उपयोग होईल. व्यवसायात अडथळा येणार नाही. मात्र कोणत्याही विश्वासू व्यक्तीवर अंधविश्वास ठेऊ नका.

हे पण वाचा : SBI शेअर देणार मोठा रिटर्न! नवीन टार्गेट प्राईस आणि स्टॉक रेटिंग जाहीर

मकर: परदेश प्रवास किंवा तिथे वास्तव्यासाठी शुभ संकेत. आत्मविश्वास वाढेल. सुरक्षा क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष सन्मान मिळेल.

कुंभ: नवीन कामाची सुरुवात होईल. मात्र आज कामात मन लागत नाही, भटकंती वाढेल. घरात किरकोळ वादविवाद होऊ शकतो.

मीन: दिवसाची सुरुवात शुभ बातम्यांनी होईल. राजकीय क्षेत्रात नाव होईल. कामात प्रशंसा मिळेल आणि नोकरचाकरांपासून समाधान मिळेल.

Leave a Reply

Discover more from Punelive24

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading