‘या’ जन्मतारखांच्या व्यक्तींवर असतो राहूचा प्रभाव; प्रेमात अपयश पण धनसंपत्ती प्रचंड!
Numerology 4 | अंकशास्त्रानुसार, प्रत्येक जन्मतारीख व्यक्तीच्या जीवनावर अनोखा प्रभाव टाकते. विशेषतः मूलांक 4 असलेल्या व्यक्तींवर राहूचा प्रभाव असतो, त्यामुळे त्यांचे जीवन इतरांपेक्षा वेगळे असते. त्यांच्या नशिबात धनसंपत्ती तर भरपूर असते, पण प्रेमाच्या बाबतीत त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. (Numerology 4)
अंकशास्त्र आणि मूलांक 4
अंकशास्त्र हा ज्योतिषशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे, जो संख्यांच्या आधारे व्यक्तीच्या जीवनाचा अभ्यास करतो. जन्मतारीख जोडून मिळणाऱ्या संख्येवरून मूलांक निश्चित केला जातो, आणि हा मूलांक 1 ते 9 या ग्रहांशी संबंधित असतो. आज आपण मूलांक 4 असलेल्या व्यक्तींच्या स्वभाव आणि आयुष्याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
कोणत्या जन्मतारीखांसाठी मूलांक 4 लागू होतो?
ज्या व्यक्तींचा जन्म 4,13, 22 आणि 31 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 4 असतो. या तारखा जोडल्यास अंतिम अंक 4 येतो, जो राहू ग्रहाशी संबंधित आहे.
राहूचा प्रभाव – नियोजनबद्ध जीवनशैली
मूलांक 4 असलेल्या व्यक्तींवर राहूचा प्रभाव असतो. त्यामुळे हे लोक नेहमी नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध आयुष्य जगतात. कोणतेही काम ठरवून, व्यवस्थित योजना करूनच पूर्ण करतात. त्यामुळे हे व्यक्ती व्यावसायिक क्षेत्रात यशस्वी ठरतात. (Numerology 4)
प्रेमप्रकरणात येतात कायमच अडथळे
या लोकांना प्रेमाबद्दल आकर्षण असते, मात्र त्यांना त्यांच्या लव लाइफमध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांचा जिद्दी स्वभाव आणि स्वतःचा हट्ट यांच्या मुळे नातेसंबंध टिकवणे कठीण जाते. अनेकदा त्यांना खूप उशिरा खरे प्रेम मिळते.
धनलाभ आणि करिअरमध्ये प्रगती
मूलांक 4 असलेल्या व्यक्तींना धनप्राप्तीचे उत्तम योग असतात. हे लोक मेहनती असतात आणि योग्य नियोजन करून यश मिळवतात. ते उत्तम डॉक्टर, वैज्ञानिक, वकील, प्राध्यापक, उद्योजक किंवा चित्रपटसृष्टीतले तज्ज्ञ होऊ शकतात.
स्वभाव कसा असतो?
हे लोक अत्यंत जिद्दी स्वभावाचे असतात. एकदा काही ठरवले की त्यावर ठाम राहतात. इतरांचे सल्ले फारसे ऐकत नाहीत आणि स्वतःच्या मर्जीप्रमाणेच वागतात.लहान वयात संघर्ष करावा लागला तरी, पुढे जाऊन मोठे यश मिळवतात.
