October 29, 2026

एप्रिल महिना ‘या’ राशींना अक्षरश: रडवणार, सूर्य मेष राशीत जाताच सुरू होणार संकटांचा काळ!

0
Punelive24 News (3)

Sun Transit 2025 : 14 एप्रिल 2025 रोजी सकाळी 3:30 वाजता सूर्य (Surya) ग्रह मेष (Mesh) राशीत गोचर करणार आहे. मेष ही मंगळ (Mangal)ग्रहाची राशी असून, सूर्य येथे उच्चस्थानी म्हणजेच सर्वाधिक बलशाली मानला जातो. अशा वेळी सूर्य जेव्हा मेष राशीत प्रवेश करतो, तेव्हा काही राशींना त्याचा अत्यंत प्रतिकूल परिणाम होतो. तर या गोचरामुळे काहींच्या आयुष्यात अचानक संकटं, आरोग्य समस्या, नातेसंबंधांतील तणाव आणि आर्थिक नुकसान होऊ शकतं.

या गोचराचा सर्वाधिक त्रास 5 राशींना होणार असल्याचे संकेत आहेत. या राशींना एप्रिलनंतर प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागेल. खाली वाचा कोणत्या आहेत त्या राशी आणि काय करावं त्यांचा त्रास कमी करण्यासाठी.

कन्या (Kanya) राशी

या राशीसाठी सूर्याचं गोचर आरोग्याच्या दृष्टीने चिंताजनक ठरू शकतं. विशेषतः पोट आणि ब्लड प्रेशर संबंधित त्रास वाढू शकतो. आर्थिक घसरण होण्याची शक्यता असून, कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी विचार करणे आवश्यक आहे. वाद-विवाद टाळावेत.

उपाय: भगवान शिवाची पूजा करा.

तुळ (Tula) राशी

सूर्याचा गोच सप्तम भावावर प्रभाव टाकेल. यामुळे वैवाहिक जीवनात तणाव , बिझनेस पार्टनरशी धोका किंवा मतभेद होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये अनिश्चितता आणि नवीन कामांमध्ये अडथळे येऊ शकतात.

उपाय: सूर्यदेवाची पूजा करा.

वृश्चिक (Vrushchik) राशी

शत्रुंच्या षडयंत्रात अडकण्याची शक्यता आहे. कोर्ट-कचेरी, कायदेशीर अडचणी, आणि मानसिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः हाडं आणि पोटाचे त्रास होऊ शकतात.

उपाय: हनुमानजीची भक्ती करा.

मकर (Makar) राशी

घरगुती तणाव वाढू शकतो. आईच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. करिअरमध्ये बदल किंवा अचानक कामाच्या दबावामुळे अस्थिरता येऊ शकते. प्रॉपर्टी संबंधित व्यवहारात अडथळे येण्याची शक्यता आहे.

उपाय: माता दुर्गेची पूजा करा.

मीन (Meen) राशी

हे गोचर आर्थिक संकट निर्माण करू शकतं. चुकीचे निर्णय किंवा अति खर्चामुळे आर्थिक स्थिती डगमगू शकते. घरगुती वाद किंवा गैरसमज टाळावेत. वाणीवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे.

उपाय: गायीला हिरवा चारा खाऊ घाला.

Leave a Reply