October 30, 2026

नामांतरावरून राज्यात वाद वाढला! आता ‘पिंपरी-चिंचवड’चं नाव बदलण्याची जोरदार मागणी

0
Pimpri Chinchwad Renaming

Pimpri Chinchwad Renaming

Pimpri Chinchwad Renaming : राज्यात सध्या नामांतराच्या मुद्द्यांनी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्याच्या मागणीनंतर आता आणखी एक मोठा प्रस्ताव समोर आला आहे. भाजपच्या महिला आमदार उमा खापरे यांनी पिंपरी-चिंचवड शहराचे नामकरण ‘जिजाऊ नगर’ करण्याची जोरदार मागणी विधान परिषदेच्या सभागृहात केली आहे. या मागणीसाठी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनही दिले आहे.

हे पण वाचा : चित्रपटासाठी सलमान खानने दिले मोठे बलिदान; बदलल्या ‘या’ सर्व सवयी

उमा खापरे यांनी सभागृहात स्पष्ट शब्दांत सांगितले की, पिंपरी-चिंचवड शहराचा विकास, प्रगती आणि महिला सक्षमीकरणात मोठा वाटा आहे. हे शहर आज औद्योगिक राजधानी म्हणून ओळखले जाते. अशा या शहराला राजमाता जिजाऊ यांचे नाव देणे हे काळाची गरज आहे, असे त्या म्हणाल्या. “राजमाता जिजाऊ या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, मातृत्वाचा आणि शौर्याचा प्रतीक आहेत. त्यांच्या नावाने शहराचे नामकरण झाल्यास पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणा मिळेल,” असेही त्या म्हणाल्या.

या मागणीमागे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक भावनाही जोडल्या गेल्या आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात अनेक महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. शहरातील विविध महिला संघटना आणि काही सामाजिक संस्था देखील या मागणीला पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत. याआधी ‘भक्ती-शक्ती प्रतिष्ठान’नेही अशाच प्रकारची मागणी मांडली होती.

दरम्यान, दुसरीकडे पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतरावरूनही वाद सुरूच आहे. भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी स्टेशनला बाजीराव पेशवे यांचे नाव देण्याची मागणी केल्यानंतर, विरोधकांनी आणि काही नागरिकांनी जोरदार टीका केली. इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी मात्र स्टेशनला जिजाऊंचे नाव देण्याची शिफारस केली. त्यामुळे यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

हे पण वाचा : सोन्याचे दर पुन्हा गगनाला भिडले! पुण्यात आज १० ग्रॅमचा भाव किती? वाचा ताजे दर

पुणे शहरातील काही भागात ‘पोस्टर वॉर’ही पाहायला मिळाली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातर्फे लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये, “कोथरूडच्या बाई, नामांतराची एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव ‘मस्तानी पेठ’ करा!” असा टोला लगावण्यात आला होता. या पोस्टरमुळे एकीकडे टीका सुरु असताना, दुसरीकडे काही नागरीकांनी या नामांतराच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

 

Leave a Reply