October 30, 2026

स्पोर्ट्स बाईक प्रेमींसाठी खुशखबर! Kawasaki ची ‘ही’ दमदार बाईक झाली स्वस्त, पाहा ऑफरनंतर किती पैसे भरावे लागणार?

0
Punelive24 News (3)

Kawasaki Ninja 300 | कावासाकी इंडिया आपल्या प्रसिद्ध मोटारसायकलींवर सवलत देत आहे. या यादीत कावासाकीची लोकप्रिय स्पोर्ट्स बाइक निन्जा 300 देखील समाविष्ट आहे. सध्या या बाइकवर तब्बल ₹25000 ची सूट देण्यात येत आहे. त्यामुळे ही बाइक घेण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी ही एक चांगली संधी ठरू शकते.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, निन्जा 300 ची मूळ एक्स-शोरूम किंमत ₹3.43 लाख आहे. पण सध्याच्या ऑफरनुसार, ही किंमत आता ₹3.18 लाख इतकी झाली आहे. ही ऑफर मे 2025 च्या अखेरपर्यंत किंवा स्टॉक संपेपर्यंत लागू असेल. म्हणजेच, मर्यादित कालावधीसाठी ग्राहकांना ही आकर्षक डील मिळू शकते.

डिझाईन आणि फिचर्स-

कावासाकी निन्जा 300 ही बाईक गेल्या दशकापासून भारतीय बाजारात उपलब्ध आहे. या बाईकच्या डिझाईन आणि फिचर्समध्ये फारसे बदल न करण्यात आल्यामुळे ती काहीशी जुनी वाटू शकते. याच कारणामुळे कावासाकीने सवलतीच्या माध्यमातून ग्राहकांना पुन्हा आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच काही अहवालांनुसार, कंपनी लवकरच या बाईकचं अपग्रेडेड मॉडेल बाजारात आणू शकते.

या बाईकमध्ये 296 सीसी क्षमतेचं पॅरलल ट्विन लिक्विड-कूल्ड इंजिन दिलं गेलं आहे, जे 38.88 बीएचपी पॉवर आणि 26.1 एनएम टॉर्क तयार करतं. याला 6-स्पीड गिअरबॉक्ससोबत असिस्ट आणि स्लिपर क्लच दिला गेला आहे. ही मोटर अनेक प्रकारच्या परिस्थितींमध्ये चांगली कामगिरी देते आणि ती अतिशय गुळगुळीत आहे.

निन्जा 300 ची स्पर्धा-

निन्जा 300 च्या सस्पेन्शनसाठी समोर टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागे लिंक्ड मोनोशॉक देण्यात आले आहे. ब्रेकिंगसाठी समोर आणि मागे डिस्क ब्रेक असून ड्युअल चॅनल एबीएसचाही समावेश आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनेही ही बाइक चांगली आहे.

जरी या बाईकचं डिझाईन थोडं पारंपरिक वाटत असलं, तरी ती अजूनही केटीएम आरसी 390, यामाहा आर3 आणि एप्रिलिया आरएस 457 सारख्या नव्या बाइक्सना कडवी स्पर्धा देते. जर एखाद्या ग्राहकाला एका विश्वासार्ह ब्रँडची, परवडणाऱ्या किंमतीत, पॉवरफुल स्पोर्ट्स बाइक हवी असेल तर कावासाकी निन्जा 300 सध्या उत्तम पर्याय ठरू शकते.

Leave a Reply