₹6 लाखांच्याही खाली किंमत असलेली हॅचबॅक भारतात लाँच ; फीचर्सही आहेत दमदार!
Citroen C3 2025 |भारतीय बाजारात हॅचबॅक गाड्यांची मागणी नेहमीच चांगली राहिलेली आहे, आणि त्यात जर फिचर्सने भरलेली परदेशी कार उपलब्ध झाली तर ग्राहकांचे लक्ष वेधले जाते. अशाच प्रकारे Citroen कंपनीने त्यांच्या लोकप्रिय C3 हॅचबॅकची अपडेटेड आवृत्ती 2025 साली लाँच केली आहे. ही फ्रेंच कार आता नवीन फिचर्ससह सुसज्ज असून तिच्या किंमतीतही थोडी वाढ करण्यात आली आहे. डिझाईनमध्ये कोणताही बदल न करता, कंपनीने कारच्या इंटीरिअर व युजर्सच्या गरजा लक्षात घेऊन काही उपयुक्त बदल केले आहेत.
Citroen C3 2025 च्या नवीन व्हर्जनमध्ये ग्राहकांना मिड आणि टॉप व्हेरिएंटमध्ये अॅडजस्टेबल हेडरेस्ट मिळणार आहे. यासोबतच, आता यामध्ये रिमोट कीलेस एंट्री, मागील पॉवर विंडोज, इलेक्ट्रिक अॅडजस्टेबल ORVM, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, LED DRL, रूफ रेल्स, स्पेअर व्हील आणि व्हॅनिटी मिरर यांसारखी अनेक उपयुक्त वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. याशिवाय, पूर्वी 30 लिटरची असणारी इंधन टाकी आता 45 लिटर क्षमतेची करण्यात आली आहे, जे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे.
डिझाईन किंवा स्टायलिंग-
गाडीच्या डिझाईन किंवा स्टायलिंगमध्ये कोणतेही बदल झालेले नाहीत, त्यामुळे ती मूळ Citroen C3 प्रमाणेच दिसते. मात्र, आतून ती अधिक युजर-फ्रेंडली बनवली गेली आहे. इंजिनच्या बाबतीतही कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ही गाडी दोन इंजिन पर्यायांमध्ये येते – 1.2 लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन जे 81 bhp पॉवर आणि 115 Nm टॉर्क निर्माण करते, तर दुसरा पर्याय म्हणजे 1.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन, जे 108 bhp पॉवर आणि 190 Nm टॉर्क जनरेट करते.
किंमत-
Citroen C3 2025 ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹6.23 लाख असून टॉप व्हेरिएंटसाठी ती ₹10.19 लाखांपर्यंत जाते. या किमतीत मिळणारी ही हॅचबॅक अनेक फीचर्सने सज्ज असल्यामुळे मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी एक आकर्षक पर्याय ठरू शकते. कंपनीने यामध्ये सुरक्षेपासून ते आरामदायक प्रवासापर्यंत सर्व गोष्टींचा विचार केला असून ही कार बजेटमध्ये दमदार फिचर्स देणाऱ्या गाड्यांमध्ये आता गणली जाईल.
