October 30, 2026

फक्त 33 रुपयांचा शेअर बनवू शकतो कोट्यधीश! ट्रायडेंटचा 414% परतावा थक्क करणारा

0
Trident Share Price Today

Trident Share Price Today

Trident Share Price Today : सध्या जिथे संपूर्ण शेअर बाजारात घसरणीचा कल दिसून येतोय, तिथे एका स्वस्त भावाच्या शेअरने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. केवळ 33.10 रुपयांवर ट्रेड होणाऱ्या ट्रायडेंट लिमिटेड या शेअरने आज 4.74 टक्क्यांची कमाल वाढ नोंदवली. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षांत या शेअरने गुंतवणूकदारांना तब्बल 414% परतावा दिला आहे, त्यामुळे अल्पभांडवलात मोठा नफा कमावण्याची संधी शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा शेअर पुन्हा चर्चेत आला आहे.

हे पण वाचा : फक्त 3 दिवसात 23% वाढ! ‘ही’ इलेक्ट्रिक बस कंपनी शेअर बाजारात तुफान कमावत आहे

आज शुक्रवारी (२५ जुलै) सकाळपासूनच शेअर बाजारात मंदीचं वातावरण होतं. सेन्सेक्स 405 अंकांनी घसरून 81,779.09 वर गेला, तर निफ्टी 138 अंकांनी घसरून 24,923.80 वर बंद झाला. पण या घसरणीतही ट्रायडेंट लिमिटेडचा शेअर मात्र ठामपणे उभा राहिला.

आजचा व्यवहार 32.95 रुपयांपासून सुरू झालेला हा शेअर दिवसभरात 33.66 रुपयांपर्यंत गेला. काही वेळेस तो 32.35 रुपयांपर्यंत खालीही आला, मात्र एकूणच बाजाराच्या तुलनेत याने चांगली स्थिरता दाखवली.

52 आठवड्यांतील या शेअरची उच्चतम किंमत 41.45 रुपये इतकी आहे, तर नीचांकी किंमत 23.11 रुपये इतकी नोंदवली गेली होती. सध्या कंपनीचे एकूण मार्केट कॅप जवळपास 17,128 कोटी रुपये इतके आहे.

गेल्या काही वर्षांत ट्रायडेंटने भक्कम परतावा दिला आहे. गेल्या पाच वर्षांचा विचार करता, कंपनीने जवळपास 414.85% परतावा दिला आहे. म्हणजे जर तुम्ही ५ वर्षांपूर्वी १ लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्या गुंतवणुकीची किंमत सुमारे ५.१४ लाख रुपये झाली असती.

हे पण वाचा : २४ कॅरेट सोनं आज किती रुपयांना? घसरण की वाढ? जाणून घ्या आजचा रेट

ब्रोकरेज हाउसेसने याला ‘BUY’ रेटिंग देत ३८ रुपयांपर्यंतचा टार्गेट प्राईस सुचवला आहे, म्हणजे अजूनही या शेअरमध्ये 14.80% पर्यंत वाढीची शक्यता तज्ज्ञांना दिसते आहे.

जरी ट्रायडेंटने १ वर्षात काहीशी नकारात्मक कामगिरी (सुमारे -9.26%) केली असली, तरी कंपनीच्या उत्पादनक्षमतेत व निर्यातीत सुधारणा होत असल्याने दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी याला पुन्हा एकदा चांगला पर्याय मानला जात आहे.

Leave a Reply