October 30, 2026

२४ कॅरेट सोनं आज किती रुपयांना? घसरण की वाढ? जाणून घ्या आजचा रेट

0
Gold Price Today

Gold Price Today

Gold Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दराने सातत्याने उच्चांक गाठत ग्राहकांची झोप उडवली आहे. २५ जुलै २०२५ रोजी देशातील सराफा बाजारात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. एक दिवसाआधी काहीशी घसरण झाल्यानंतर आज सोन्याच्या किमतींनी पुन्हा उसळी घेतली असून, ग्राहक आणि गुंतवणूकदार दोघेही संभ्रमात सापडले आहेत. ‘महाग झालं की स्वस्त?’ असा प्रश्न आता अनेकांच्या मनात घर करून बसला आहे.

हे पण वाचा : 25 जुलैला ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाचा कहर! रेड अलर्ट जाहीर

आज सकाळी बुलियन मार्केटने जाहीर केलेल्या दरांनुसार, देशभरात २४ कॅरेट सोन्याचा दर ९८,९९० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे, तर २२ कॅरेट सोन्याची किंमत ९०,७४१ रुपये इतकी झाली आहे. चांदी देखील मागे नाही. १ किलो चांदीचा दर १,१५,५८० रुपये तर १० ग्रॅम चांदीसाठी १,१५६ रुपये मोजावे लागत आहेत. उत्पादन शुल्क, जीएसटी आणि दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस यामुळे प्रत्यक्षात ग्राहकांना द्यावे लागणारे दर याहूनही अधिक असतात.

मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूरसारख्या प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचे दर सारखेच आहेत. २२ कॅरेटचे १० ग्रॅम सोनं ९०,५७६ रुपयांना तर २४ कॅरेटचे ९८,८१० रुपयांना विकले जात आहे. हे दर दररोज बदलत असल्याने खरेदीपूर्वी स्थानिक सराफाकडून खात्री करून घेणे आवश्यक आहे. येणाऱ्या सणासुदीच्या काळात सोनं खरेदी करण्याचे बेत आखणाऱ्या गृहिणींना आता बजेट पुन्हा विचारात घ्यावे लागणार आहे.

अनेक ग्राहकांना ‘२२ कॅरेट आणि २४ कॅरेट’ यातील फरक ठाऊक नसतो. २४ कॅरेट सोने हे सुमारे ९९.९ टक्के शुद्ध असते, परंतु ते खूप मऊ असल्यामुळे त्याचे दागिने सहजपणे बनवता येत नाहीत. त्यामुळे बाजारात दागिन्यांसाठी प्रामुख्याने २२ कॅरेटचे सोने वापरले जाते. या सोन्यात ९ टक्के इतर धातूंचे मिश्रण करून ते मजबूत बनवले जाते. परिणामी, दागिन्यांची टिकाऊपणा वाढतो.

हे पण वाचा : आजचा दिवस कोणासाठी ठरणार सुपर लक्की? जाणून घ्या तुमची रास!

सोन्याच्या दरात होणाऱ्या सततच्या चढ-उतारामागे अनेक आंतरराष्ट्रीय कारणं आहेत. जागतिक बाजारातील अस्थिरता, डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण, परदेशी गुंतवणूकदारांचा कल आणि अमेरिकेच्या व्याजदर धोरणाचा थेट परिणाम भारतातील सराफा बाजारावर होतो. सध्या या सगळ्या घटकांचा परिणाम म्हणून दरात मोठी चढ-उतार होत आहे.

Leave a Reply