82 रुपयांचा शेअर 3 आठवड्यात 150 च्या पार! गुंतवणूकदारांना जबरदस्त नफा
Sambhav Steel IPO
Sambhav Steel IPO : शेअर बाजारात नुकतीच एन्ट्री घेणारी “संभव स्टील ट्यूब्स लिमिटेड” ही कंपनी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. २५ जून २०२५ रोजी कंपनीचा आयपीओ अवघ्या ८२ रुपयांना खुला झाला होता आणि आज केवळ ३ आठवड्यांच्या आत तिच्या शेअरने १५० रुपयांच्या जवळ पोहोचत तब्बल ८२ टक्क्यांचा दमदार परतावा दिला आहे. गुंतवणूकदारांच्या दृष्टीने ही कमाई अतिशय आकर्षक मानली जात आहे, विशेषतः अल्पकालीन बाजारात अशा वेगवान वाढीचा अनुभव क्वचितच मिळतो.
हे पण वाचा : आज जाहीर होणार 60 कंपन्यांचे निकाल, कोणती शेअर्स देतील धक्का?
मंगळवारी बीएसईवरील इंट्राडे ट्रेडिंगमध्ये संभाव स्टीलच्या शेअर्सने १६ टक्क्यांनी उसळी मारत १४९.२४ रुपयांपर्यंत झेप घेतली. ही आतापर्यंतची कंपनीची सर्वोच्च शेअर किंमत ठरली असून त्याच दिवशी शेअरने १३८.६९ रुपयांवर स्थिरावून आपली ताकद दाखवून दिली. यामुळे अल्पावधीत मोठा नफा कमावणाऱ्यांसाठी संभाव स्टील आकर्षणाचं केंद्र बनली आहे.
२ जुलै २०२५ रोजी बीएसई आणि एनएसईवर अनुक्रमे ११०.१० व ११० रुपयांवर लिस्ट झालेल्या या शेअरने सुरुवातीला काहीसा दबाव झेलला. मात्र, बाजारातील सकारात्मक भावना आणि गुंतवणूकदारांचा विश्वास यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ झाली. कंपनीचं एकूण मार्केट कॅप सध्या ४,०८५ कोटी रुपयांच्या पुढे गेले असून ती बाजारातील मध्यम आकाराच्या कंपन्यांच्या स्पर्धेत येऊ लागली आहे.
संभव स्टील ट्यूब्सचा आयपीओ देखील प्रचंड यशस्वी ठरला होता. गुंतवणूकदारांनी दिलेला प्रतिसाद लक्षवेधी होता. एकूण आयपीओ ३०.३३ पट भरला गेला आणि QIB श्रेणीमध्ये तब्बल ६६ पट अधिक मागणी होती. यावरून स्पष्ट होतं की संस्थात्मक गुंतवणूकदारांचंही या कंपनीवर मोठं विश्वास आहे. याशिवाय किरकोळ गुंतवणूकदार, कर्मचारी व नॉन-इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदार यांनीही भरघोस प्रतिसाद दिला.
हे पण वाचा : मोतीलाल ओसवालने दिले 5 दमदार शेअर टार्गेट्स, खरेदी केली नाही तर पश्चात्ताप होईल!
आयपीओपूर्वी प्रवर्तकांचा कंपनीतील हिस्सा ७१.९ टक्के होता, जो आता ५७.४ टक्क्यांवर आला आहे. याचा अर्थ कंपनी अधिक खुल्या शेअरहोल्डिंगकडे वळत आहे, जे बाजारासाठी आणि गुंतवणूकदारांसाठी चांगलं संकेत मानलं जातं.
