October 29, 2026

आज जाहीर होणार 60 कंपन्यांचे निकाल, कोणती शेअर्स देतील धक्का?

0
Q1 Results 2025 India

Q1 Results 2025 India

Q1 Results 2025 India : शेअर बाजारात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आज एकाच दिवशी तब्बल ६० कंपन्या आपल्या एप्रिल-जून (Q1) २०२५-२६ तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करणार आहेत. यामध्ये इन्फोसिस, डॉ. रेड्डीज लॅब, बजाज हाऊसिंग फायनान्स, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स, महिंद्रा हॉलिडेज, आदित्य बिर्ला रिअल इस्टेट यांसारख्या दिग्गज कंपन्यांचा समावेश असून गुंतवणूकदारांचे लक्ष या निकालांवर केंद्रित आहे.

हे पण वाचा : मोतीलाल ओसवालने दिले 5 दमदार शेअर टार्गेट्स, खरेदी केली नाही तर पश्चात्ताप होईल!

विशेषतः IT क्षेत्रातील दिग्गज इन्फोसिसच्या तिमाही निकालांवर सर्वांचे लक्ष लागले आहे. कंपनीचा महसूल वाढण्याची शक्यता असली तरी निव्वळ नफ्यात काहीशी घट होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. वित्तीय सेवा क्षेत्रातील मजबूत उपस्थितीमुळे कंपनीची कामगिरी चांगली राहण्याची अपेक्षा आहे. मात्र, उच्च कर्मचारी खर्च आणि प्रोजेक्ट डिलेमुळे तिमाही नफा थोडा घटण्याची शक्यता आहे.

डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या कामगिरीबाबतही सकारात्मक अपेक्षा आहेत. विशेषतः औषध निर्यातीचा टक्का वाढल्यामुळे कंपनीचा महसूल आणि नफा वाढू शकतो. बजाज हाऊसिंग फायनान्ससारख्या NBFC कंपन्यांसाठी वाढत्या व्याजदरांच्या पार्श्वभूमीवर ग्राहक कर्जवाढ व क्रेडिट पोर्टफोलिओ यामध्ये बदल झालेला दिसेल, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

आज निकाल जाहीर करणाऱ्या कंपन्यांमध्ये उत्पादन, फार्मा, केमिकल, IT, ऊर्जा, रिअल इस्टेट, फायनान्स आणि अन्न उद्योग क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश आहे. यामध्ये बोरोसिल रिन्यूएबल्स, रॅटनइंडिया पॉवर, जॉन्सन फार्माकेअर, बिकाजी फूड्स, सॅफायर फूड्स, पर्सिस्टंट सिस्टीम्स, सिंजीन इंटरनॅशनल, थायरोकेअर टेक्नॉलॉजीज, SRF लिमिटेड, वेस्टलाइफ फूडवर्ल्ड यांसारख्या नामांकित कंपन्याही आहेत.

स्थानिक व जागतिक आर्थिक परिस्थिती, महागाईचा दर, अमेरिकन डॉलरची स्थिती, युरोप आणि चीनमधील मंदीची चिन्हे यामुळे भारतीय कंपन्यांच्या कामगिरीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे या निकालांमधून उद्योग क्षेत्राचा आरोग्यदर्शक संकेत मिळणार आहे.

हे पण वाचा : फक्त 21 रुपयांचा शेअर, पण श्रीमंत बनवू शकतो! जाणून घ्या टार्गेट प्राईस

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. या निकालांच्या पार्श्वभूमीवर काही शेअर्समध्ये मोठी चढ-उतार पाहायला मिळू शकते. त्यामुळे सध्याच्या घडामोडी, कंपनीची मार्गदर्शक सूचनांची (guidance) शैली आणि तिमाही आकडे यांच्यावर गुंतवणूकदारांनी बारकाईने नजर ठेवावी, असा सल्ला विश्लेषक देत आहेत.

Leave a Reply