अदानी पॉवर शेअर पुन्हा फॉर्ममध्ये! मोठ्या परताव्याची संधी, नवीन टार्गेट जाहीर
Adani Power Share
Adani Power Share : भारतीय शेअर बाजारात आजचा दिवस उत्साहवर्धक ठरला. सकाळच्या ट्रेडिंग सत्रातच बीएसई सेन्सेक्स तब्बल 408 अंकांनी उसळी मारून 82,662 च्या पातळीवर पोहोचला. तर निफ्टीदेखील 134 अंकांची भर घालून 25,217 वर बंद झाला. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ‘अदानी पॉवर लिमिटेड’चा शेअर बाजारात विशेष चर्चेत राहिला.
हे पण वाचा : फक्त ₹15 मध्ये हा पेनी स्टॉक! 17% रिटर्नची संधी, तज्ञांचं लक्ष ‘या’ शेअरवर
अदानी ग्रुपच्या या ऊर्जा क्षेत्रातील दिग्गज कंपनीचा शेअर आज 608 रुपयांच्या आसपास ट्रेड करत होता. दिवसाची सुरुवात 612.90 रुपयांवर झाली. काही वेळातच या शेअरने 616 रुपयांचा उच्चांक गाठला, तर निचांकी पातळी 608.2 रुपये होती. सध्याच्या किंमतीच्या तुलनेत पुढील काही महिन्यांत २३% पर्यंतचा अपसाईड रिटर्न मिळू शकतो, असा विश्वास अनेक ब्रोकिंग फर्म्सनी व्यक्त केला आहे. त्यामुळेच अनेक गुंतवणूकदारांचा कल अदानी पॉवरकडे वळलेला दिसतो.
या शेअरचा गेल्या ५२ आठवड्यांचा उच्चांक 752.9 रुपये असून नीचांकी स्तर 432 रुपये इतका आहे. म्हणजेच गेल्या वर्षभरात या शेअरने चांगलीच झेप घेतलेली आहे. कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या ₹2.35 लाख कोटींच्या घरात आहे, जे ऊर्जा क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांमध्ये लक्षणीय मानले जाते.
ब्रोकिंग विश्लेषकांच्या मते, कंपनीच्या बिझनेस मॉडेलमधील स्थैर्य, वाढती पॉवर डिमांड आणि ग्रीन एनर्जीमध्ये होणारी गुंतवणूक या सर्व घटकांमुळे अदानी पॉवरचा शेअर पुढील काही तिमाहींत तेजी दाखवू शकतो. शिवाय, सरकारच्या पायाभूत सुविधा वाढवण्याच्या धोरणालाही पॉवर सेक्टरचा चांगला पाठिंबा मिळतोय, हे लक्षात घेतलं तर ही कंपनी अधिकच आकर्षक गुंतवणूक पर्याय बनते.
हे पण वाचा : ‘हा’ सरकारी शेअर गाठणार नवा उच्चांक? 34% अपसाईडची शक्यता, जाणून घ्या तज्ज्ञांचं मत
आज निफ्टी बँक निर्देशांकानेही 310 अंकांची झेप घेत 57,075 चा टप्पा पार केला, तर आयटी निर्देशांक 296 अंकांनी वधारला. स्मॉलकॅप निर्देशांकानेही 471 अंकांची घौडदौड केली. यामुळे संपूर्ण मार्केटमध्ये तेजीचे वातावरण होते.
