सोने खरेदी करणार आहात? पुण्यात आजचा नवा दर काय आहे ते पहा!
Gold Price Today
Gold Price Today : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती आणि गुंतवणूकदारांचा कल यामुळे भारतातील सराफा बाजारात सोन्याचे दर सतत चढते राहिले होते. मात्र २८ जुलै २०२५ या सोमवारी सकाळी अचानक दरात घसरण झाल्यानंतर बाजारात दुपारी मोठा ‘यू-टर्न’ पाहायला मिळाला. त्यामुळे सोन्याचे दर पुन्हा एकदा चढत्या भावात पोहोचले असून ग्राहक आणि गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
हे पण वाचा : राज्यात पावसाचा कहर! IMD चा अलर्ट, नागरिकांनी सावध राहा
आज मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक या प्रमुख शहरांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ९८,२६० रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत गेला असून, २२ कॅरेटचा दर ९०,०७२ रुपये इतका आहे. हे दर बुलियन मार्केटच्या ताज्या अपडेटनुसार आहेत. चांदीच्या दरातही किंचित वाढ झाली असून, १ किलो चांदीचा दर १,१३,४५० रुपये इतका आहे.
गेल्या आठवड्यात २४ कॅरेट सोने काही काळासाठी ९७ हजाराच्या खाली गेले होते. त्यामुळे अनेकांनी खरेदीची संधी साधली होती. मात्र आज पुन्हा वाढ झाल्याने सोनं खरेदीचा मुहूर्त शोधणाऱ्यांना धक्का बसला आहे. या दरात जीएसटी, मेकिंग चार्जेस, स्थानिक करांचा समावेश नसल्यामुळे प्रत्यक्ष दागिने खरेदी करताना किंमत आणखी वाढते.
सोने खरेदी करताना ‘कॅरेट’चा प्रश्न सर्वात महत्त्वाचा ठरतो. २४ कॅरेट सोने म्हणजे जवळपास ९९.९% शुद्धतेचं असतं, जे मुख्यतः नाणं किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी वापरलं जातं. याचे दागिने बनवणं कठीण असल्यामुळे रोजच्या वापरासाठी सर्रास २२ कॅरेटचे दागिने घेतले जातात. २२ कॅरेटमध्ये अंदाजे ९१% सोने आणि उरलेले तांबे, चांदी किंवा जस्त यांचे मिश्रण असते. त्यामुळे दागिन्यांना मजबुती मिळते.
हे पण वाचा : प्रेमसंबंध, पैसा, आरोग्य… तुमच्या राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल?
सध्याच्या अस्थिर बाजारात सोनं हे अजूनही सुरक्षित गुंतवणूक मानलं जात आहे. मात्र दररोज बदलणारे भाव सामान्य ग्राहकांसाठी गोंधळात टाकणारे ठरत आहेत. अशावेळी एखाद्या विश्वासार्ह स्थानिक सराफाकडून योग्य माहिती घेऊनच खरेदी करावी, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.
