1 ऑगस्टपासून महत्त्वाचे नियम बदलणार! तुमच्यावर होणार मोठा परिणाम
New Rules August 2025
New Rules August 2025 : 1 ऑगस्ट 2025 पासून देशात काही महत्त्वाचे आर्थिक आणि दैनंदिन व्यवहारांशी संबंधित बदल लागू होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सामान्य जनतेच्या खिशावर आणि जगण्याच्या खर्चावर होणार आहे. हे बदल UPI व्यवहार, SBI क्रेडिट कार्डचे फायदे, गॅस आणि इंधन दर तसेच रिझर्व्ह बँकेच्या धोरणात्मक निर्णयांशी निगडीत आहेत. या सर्व घडामोडींचा आपल्या रोजच्या आर्थिक व्यवहारांवर प्रभाव पडणार आहे.
हे पण वाचा : सोने खरेदी करणार आहात? पुण्यात आजचा नवा दर काय आहे ते पहा!
सर्वात आधी बोलू या UPI व्यवहारांतील बदलांबद्दल. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने 1 ऑगस्टपासून काही नवीन नियम लागू केले आहेत. आता Paytm, PhonePe, Google Pay यांसारख्या UPI अॅप्सवर व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना काही मर्यादा पाळाव्या लागणार आहेत. एका दिवशी 50 वेळांहून अधिक बॅलन्स चेक करता येणार नाही. तसेच एका मोबाइल नंबरवर लिंक असलेल्या बँक खात्याचा तपशील एका अॅपवर दिवसातून फक्त 25 वेळाच पाहता येणार आहे. शिवाय AutoPay व्यवहार ठराविक तीन वेळाच होतील – सकाळी 10 वाजेपूर्वी, दुपारी 1 ते 5 यामध्ये, आणि रात्री 9:30 नंतर. NPCI च्या मते, या बदलामुळे सेवा अधिक वेगवान आणि सुरक्षित होतील.
SBI क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी देखील मोठी अपडेट आहे. SBI चे ELITE किंवा PRIME को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांना विमान अपघात विम्याचे कव्हर आता मिळणार नाही. पूर्वी हे कव्हर ₹50 लाख ते ₹1 कोटींपर्यंत होते. SBI-UCO, सेंट्रल बँक, करूर वैश्य बँक यांसारख्या बँकांशी भागीदारी असलेल्या कार्डांवर हा बदल लागू होणार आहे. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बाब ठरू शकते.
हे पण वाचा : राज्यात पावसाचा कहर! IMD चा अलर्ट, नागरिकांनी सावध राहा
गॅस आणि इंधनाच्या किमतींमध्येही बदल होण्याची शक्यता आहे. 1 ऑगस्ट रोजी तेल कंपन्या दरांचा आढावा घेणार आहेत. जुलै महिन्यात कमर्शियल LPG सिलिंडर ₹60 ने स्वस्त झाला होता, पण घरगुती गॅसचे दर स्थिर राहिले होते. यावेळी घरगुती वापरासाठी थोडी सवलत मिळू शकते, अशी शक्यता आहे. मुंबईत सध्या CNG ₹79.50 प्रति किलो आणि PNG ₹49 प्रति युनिट आहे. एप्रिलपासून यामध्ये कोणताही बदल झाला नव्हता. विमान इंधनाच्या दरातही बदल होऊ शकतो – जर दर वाढले, तर हवाई प्रवास महाग होईल, आणि दर कमी झाल्यास भाड्यात दिलासा मिळू शकतो.
