October 29, 2026

राज्यात पावसाचा कहर! IMD चा अलर्ट, नागरिकांनी सावध राहा

0
Rain Alert

Rain Alert

Rain Alert : राज्यभरात मागील काही दिवसांपासून पावसाने दमदार पुनरागमन केलं असून, २८ जुलै रोजीही अनेक भागांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आज यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे.

हे पण वाचा : प्रेमसंबंध, पैसा, आरोग्य… तुमच्या राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल?

मुंबई, ठाणे परिसरात सकाळपासून ढगाळ वातावरण असून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. विशेषतः रायगड जिल्ह्यात हवामान खात्याने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून सखल भागांमध्ये पाणी साचण्याचा धोका निर्माण झाला आहे. स्थानिक प्रशासनाने आवश्यक यंत्रणा सतर्क ठेवली आहे. नागरिकांनी गरज नसताना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं जात आहे.

पुणे शहरात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. काही भागांत विजांसह पावसाच्या सरी कोसळत आहेत. शहरी भागात वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र ग्रामीण भागात या पावसामुळे खरीप हंगामाच्या कामांना गती मिळाली आहे. पेरणीपूर्व मशागती, खतफेक आणि लागवड प्रक्रियेला वेग आला आहे.

विदर्भात गेल्या दोन दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे काही भागांत पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर जिल्ह्यांमध्ये नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. काही खेड्यांचा संपर्क तात्पुरता तुटला असून मदत व बचाव कार्य सुरु आहे. स्थानिक प्रशासन सतत परिस्थितीवर नजर ठेवून आहे.

हे पण वाचा : आजच्या ट्रेडिंगमध्ये मोठा धक्का! सेन्सेक्स कोसळला, कोणते शेअर्स वधारले?

पावसाच्या या हजेरीमुळे जुलै अखेरीस राज्यातील एकंदर शेती परिस्थितीत मोठा सकारात्मक बदल दिसून येत आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आशेचे किरण उमटले आहेत. अनेक शेतकरी आता मुख्य पीकपेरणीकडे वळले असून काही भागांत मका, सोयाबीन, उडीद, तूर यांसारख्या पिकांची लागवड जोरात सुरू आहे.

 

Leave a Reply