सोनं खरेदी करणार आहात? थांबा! आजचा दर पाहून तुम्हीही थक्क व्हाल
Gold Price Today
Gold Price Today : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या दरात सतत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मात्र गुरुवार, १७ जुलै २०२५ रोजी सराफा बाजारात जो काही उलथापालथीचा साक्षात्कार झाला, त्याने सामान्य ग्राहकांपासून गुंतवणूकदारांपर्यंत साऱ्यांनाच चकित केलं आहे. एकीकडे सोनं पुन्हा एकदा गगनचुंबी दराने विक्रमी पातळीवर पोहोचले, तर दुसरीकडे चांदीनेही ऐतिहासिक झेप घेतली. परिणामी, बाजारात खळबळ उडाली असून, सोनं खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांना मोठा विचार करावा लागणार आहे.
हे पण वाचा : आज १७ जुलैचं राशीभविष्य: कोणाच्या नशिबात धनलाभ, कोणाला कोर्टातून दिलासा? वाचा सविस्तर
आज गुरुवारी सकाळी सोन्याच्या दरात थोडीशी नरमाई दिसून आली होती. पण अवघ्या काही तासांतच बाजाराने वेग घेतला आणि दरात प्रचंड उसळी झाली. त्यामुळे अनेकांनी वाट पाहिलेल्या ‘भाव कमी होण्याच्या’ संधीवर पाणी फिरलं.
आजचे सोन्याचे दर काय आहेत?
बुलियन मार्केटच्या ताज्या आकडेवारीनुसार, २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर आज १० ग्रॅमसाठी ९७,७५० रुपये इतका आहे, तर २२ कॅरेट सोनं ८९,६०४ रुपये दराने विकले जात आहे. चांदीही मागे राहिलेली नाही. आज १ किलो चांदीचा दर १,१२,०१० रुपये इतका नोंदवला गेला आहे. १० ग्रॅमसाठी चांदीचा दर १,१२० रुपये आहे. या किमती जीएसटी व अन्य करांशिवाय आहेत.
मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या प्रमुख शहरांमध्ये आज २२ कॅरेटचे सोनं ८९,४८५ रुपये आणि २४ कॅरेटचे सोनं ९७,६२० रुपये दराने विकले जात आहे. दरांमध्ये फारसा फरक नसला तरी स्थानिक ज्वेलर्सकडून मेकिंग चार्ज आणि जीएसटीमुळे प्रत्यक्षात किंमत आणखी वाढू शकते.
गेल्या काही आठवड्यांपासून सोनं विकत घेण्याची इच्छा बाळगून बसलेल्या ग्राहकांना आजच्या भाववाढीमुळे मोठा धक्का बसला आहे. काहींनी अशी प्रतिक्रिया दिली की, “आम्ही वाट पाहात होतो की भाव खाली येतील आणि मग खरेदी करू. पण उलटच झालं. आता वाट पाहावी की नाही, हाच प्रश्न आहे.”
दुसरीकडे, काही ग्राहकांना अजूनही भीती आहे की, हे दर येथून पुढे आणखी वाढू शकतात. म्हणून काहींनी तात्काळ खरेदीचा निर्णय घेतल्याचंही दिसून आलं. सराफा दुकानदारांचं म्हणणं आहे की, ‘सणासुदीच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर आता मागणी झपाट्याने वाढू शकते.’
हे पण वाचा : आज बाजारात फोकसमध्ये असतील ‘हे’ शेअर्स; गुंतवणूकदारांसाठी मोठा अलर्ट
सोने खरेदी करताना बहुतांश ग्राहक गोंधळात पडतात की, २२ कॅरेट घ्यावं की २४ कॅरेट? यासाठी सोप्पा नियम असा की, २४ कॅरेट सोनं ९९.९ टक्के शुद्ध असतं. मात्र यापासून दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे सर्रासपणे दागिन्यांसाठी २२ कॅरेट सोन्याचाच वापर होतो. २२ कॅरेटमध्ये साधारणतः ९ टक्के इतर धातू जसे की तांबे, चांदी यांचं मिश्रण असतं.
अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर धोरणातील बदल, आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, आणि चलन मूल्यातील घसरण या प्रमुख कारणांमुळे सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळतात. त्यातच भारतात लग्नसराई आणि सणांचा काळ जवळ येत असल्यामुळे मागणी वाढण्याची शक्यता आहे.
