October 31, 2026

आज बाजारात फोकसमध्ये असतील ‘हे’ शेअर्स; गुंतवणूकदारांसाठी मोठा अलर्ट

0
Stocks In Focus Today

Stocks In Focus Today

Stocks In Focus Today : गुरुवारच्या बाजारात गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेणारे अनेक महत्त्वाचे शेअर्स चर्चेत राहण्याची शक्यता आहे. एसबीआय, मारुती सुझुकी, जेएसडब्ल्यू एनर्जी, हिंदुस्तान झिंक, इक्सिगो यांसारख्या १५ कंपन्यांच्या शेअर्समध्ये हालचाल दिसून येण्याची शक्यता असून त्यांच्या मागील कामगिरी, तिमाही निकाल, क्यूआयपी, न्यायालयीन निकाल आणि लाभांश यांसारख्या घडामोडी गुंतवणूकदारांसाठी निर्णायक ठरणार आहेत.

हे पण वाचा : आज शेअर बाजार कोसळला, पण गुंतवणूकदार ‘या’ मिडकॅप शेअर्सवर फिदा!

सर्वाधिक लक्ष वेधणारी घडामोड म्हणजे एसबीआयकडून तब्बल ₹२५,००० कोटींचा क्यूआयपी प्लॅन. यासाठी ८११.०५ रुपयांचा फ्लोअर प्राईस ठरवण्यात आला असून ५% पर्यंत सवलतीचा पर्यायही खुला आहे. २०१७ नंतर प्रथमच एसबीआय इक्विटीच्या माध्यमातून मोठं भांडवल उभारणार आहे.

इक्सिगो (Ixigo) या ट्रॅव्हल बुकिंग कंपनीने एप्रिल-जून तिमाहीत मजबूत आर्थिक कामगिरी केली आहे. नफा २८% आणि महसूल ७४% ने वाढला आहे. यामुळे छोट्या गुंतवणूकदारांच्या नजरा या स्टॉककडे वळू शकतात.

टेक महिंद्राचा नफा थोडासा घसरला असला तरी EBIT आणि मार्जिनमध्ये सुधारणा झाली आहे. त्यामुळे IT क्षेत्रातील या दिग्गजाकडे मोठ्या गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. मारुती सुझुकीने आपल्या एर्टिगा आणि बलेनो या लोकप्रिय गाड्यांच्या किंमती वाढवल्या आहेत. ही वाढ नवीन ६ एअरबॅगच्या नियमामुळे झाली आहे. वाहन उद्योगातील बदलाचा परिणाम शेअर प्राइसवर होण्याची शक्यता आहे.

हिंदुस्तान झिंकला राजस्थानमध्ये नवा खनिज ब्लॉक मिळाल्याने भविष्यातील उत्पादन आणि महसूल वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, JSW एनर्जीच्या उपकंपनीला सर्वोच्च न्यायालयात फटका बसला आहे. हिमाचल सरकारला १८% वीज मोफत देण्याचा आदेश कायम ठेवण्यात आल्यामुळे याचा तात्पुरता परिणाम शेअरवर दिसून येऊ शकतो.

हे पण वाचा : शेअर बाजारात मोठी संधी! अदानी विल्मरवर 37% रिटर्न देणारे तज्ज्ञांचे मत

L&T टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसचा नफा थोडकाच वाढला असला तरी महसूल घसरल्याने गुंतवणूकदार काही प्रमाणात सावध राहू शकतात. GMR एअरपोर्ट्सच्या तिमाहीत प्रवासी वाहतूक वाढली असली तरी अपेक्षेपेक्षा घसरलेली आकडेवारी बाजाराला विचलित करू शकते.

दरम्यान, एलटी फूड्स, अरविंद लिमिटेड, एसआरएफ, बर्जर पेंट्स, प्रेसिजन वायर्स आणि पुदुमजी पेपर प्रॉडक्ट्स यांनी आपल्या लाभांश आणि AGM संदर्भात तारखा जाहीर केल्या आहेत. हे अपडेट्सही बाजारासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.

 

Leave a Reply