June 13, 2026

जिओ फायनान्शिअल शेअरबाबत मोठी भविष्यवाणी, बाजार घसरला तरी टार्गेट प्राइस वाढला!

0
Jio Financial Share Price

Jio Financial Share Price

Jio Financial Share Price : भारतीय शेअर बाजारात सध्या घसरणीचा माहौल असतानाही काही निवडक शेअर्स गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेत आहेत. रिलायन्स समूहाच्या जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीच्या शेअरबाबत चॉइस ब्रोकिंग हाऊसनं सकारात्मक मत व्यक्त केलं असून, आगामी काळात या शेअरमध्ये वाढीची शक्यता असल्याचं त्यांनी आपल्या अलीकडील अहवालात म्हटलं आहे. त्यामुळे बाजार घसरत असतानाही हा शेअर विश्लेषकांच्या रडारवर आला आहे.

हे पण वाचा : शांती गोल्डच्या IPO ला जबरदस्त सुरूवात! मोठ्या गुंतवणूकदारांनी दाखवला विश्वास

आज शुक्रवार, २५ जुलै २०२५ रोजी शेअर बाजार उघडताच बीएसई सेन्सेक्स जवळपास ६९३ अंकांनी कोसळून ८१,४९१.१० वर बंद झाला. तर, निफ्टी निर्देशांक २३१ अंकांच्या घसरणीसह २४,८३०.५५ वर स्थिरावला. बँकिंग, आयटी, स्मॉलकॅप क्षेत्रातील कंपन्यांमध्ये मोठी घसरण झाली असून गुंतवणूकदारांमध्ये अस्थिरतेचं वातावरण आहे.

या पार्श्वभूमीवर, जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचा शेअर -१.५७% घसरून ३११.५५ रुपयांवर ट्रेड करत आहे. मात्र, दिवसभरात या शेअरने ३१५.५५ रुपयांचा उच्चांक गाठला होता. ३१०.५० रुपयांपर्यंत खाली घसरलेला हा शेअर सध्या गुंतवणूकदारांच्या बारकाईने निरीक्षणाखाली आहे.

गेल्या ५२ आठवड्यांचा विचार करता या शेअरने १९८.६५ रुपयांची नीचांकी आणि ३६३ रुपयांची उच्चांकी पातळी गाठलेली आहे. यावरून या शेअरमध्ये असलेली चढउतार स्पष्ट होते. सध्या कंपनीचं मार्केट कॅप ₹१,९७,७१४ कोटींच्या घरात असून, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा शेअर उपयुक्त ठरू शकतो, असं ब्रोकिंग संस्थांचं मत आहे.

हे पण वाचा : केवळ २ लाखांत ह्युंदाई क्रेटा! बघा EMI किती येतो आणि कोणता व्हेरिएंट बेस्ट आहे?

चॉइस ब्रोकिंगने जिओ फायनान्शिअल शेअरसाठी ‘Buy’ (खरेदी करा) ही शिफारस दिली आहे. त्यांनी टार्गेट प्राईस ३६५ रुपये निश्चित केलं असून, सध्याच्या दराच्या तुलनेत या शेअरमध्ये १५ ते १७% परतावा मिळू शकतो, असं अनुमान आहे. ही शिफारस आर्थिक कार्यक्षमतेचा, ग्राहक बेस आणि कंपनीच्या वाढीच्या संभाव्य योजनांचा विचार करून करण्यात आली आहे.

 

Leave a Reply

Discover more from Punelive24

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading