शांती गोल्डच्या IPO ला जबरदस्त सुरूवात! मोठ्या गुंतवणूकदारांनी दाखवला विश्वास
Shanti Gold IPO
Shanti Gold IPO : मुंबईतील प्रतिष्ठित ज्वेलरी उत्पादक कंपनी ‘शांती गोल्ड इंटरनॅशनल लिमिटेड’चा बहुचर्चित IPO आज, गुरुवार २५ जुलै २०२५ रोजी खुले झाला असून, गुंतवणूकदारांमध्ये याबाबत उत्सुकता वाढली आहे. ३६०.११ कोटी रुपयांचा हा पब्लिक इश्यू २९ जुलै रोजी बंद होणार आहे. याआधी IPO उघडण्याच्या एक दिवस आधी, म्हणजे २४ जुलै रोजी, कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून तब्बल १०८.०३ कोटी रुपयांचा निधी उभारण्यात यश मिळवलं आहे.
हे पण वाचा : बाजारात पुन्हा विश्वासाचे वारे! आज कोणते शेअर्स झळकले? वाचा संपूर्ण रिपोर्ट
शांती गोल्ड इंटरनॅशनलने १५ अँकर गुंतवणूकदारांना १९९ रुपये प्रति शेअर या दराने ५४.२९ लाख शेअर्स वाटप करून हा निधी उभा केला आहे. या गुंतवणूकदारांमध्ये सोसायटी जनरल, वेल्थवेव्ह कॅपिटल फंड, फाउंडर्स कलेक्टिव्ह फंड, स्मार्ट होरायझन अपॉर्च्युनिटी फंड, स्वयंम इंडिया अल्फा फंड आणि सनराइज इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज यांसारख्या नावाजलेल्या संस्थांचा समावेश आहे.
IPO साठी ठरवलेला किंमत बँड १८९ ते १९९ रुपये प्रति शेअर असा आहे. तर लॉट साईज म्हणजेच किमान बोलीसाठी ७५ शेअर्सची आवश्यकता आहे. IPO यशस्वी झाल्यास ३० जुलै २०२५ रोजी शेअर्सचे वाटप केले जाईल आणि त्यानंतर १ ऑगस्ट रोजी NSE व BSE वर लिस्टिंग अपेक्षित आहे.
या IPO अंतर्गत १.८१ कोटी नव्या शेअर्सची विक्री केली जाणार असून, यामध्ये ५०% हिस्सा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी, ३५% हिस्सा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आणि उर्वरित १५% बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. ‘चॉइस कॅपिटल अॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड’ हे या IPO चे बुक रनिंग लीड मॅनेजर असून, ‘बिगशेअर सर्व्हिसेस’ हे रजिस्ट्रार म्हणून काम पाहत आहेत.
हे पण वाचा : सगळं उलटलं! Tesla शेअर्स कोसळले, Elon Musk यांना मोठा आर्थिक फटका
शांती गोल्ड इंटरनॅशनल IPO मधून मिळणाऱ्या ४६.३ कोटी रुपयांचा वापर जयपूरमध्ये नवीन कारखाना उभारण्यासाठी करणार आहे. याशिवाय, २०० कोटी रुपये खेळत्या भांडवलासाठी आणि १७ कोटी रुपये कर्ज परतफेडीसाठी वापरण्याचे नियोजन आहे. उर्वरित रक्कम ही विविध सामान्य कॉर्पोरेट गरजांसाठी वापरण्यात येणार आहे.
