October 31, 2026

‘या’ अ‍ॅपच्या माध्यमातून तपासा तुमचं सोन खरं आहे की खोट? वाचा संपूर्ण प्रक्रिया

0
BIS CARE App

BIS CARE App

BIS CARE App : नवीन दागिना घेताना सोनं खरं आहे की खोटं, ही शंका मनात डोकावत असते. कारण आजही अनेक ग्राहक हॉलमार्क नसलेल्या किंवा अपुरी माहिती असलेल्या दागिन्यांची खरेदी करताना फसतात. आता ही शंका दूर करण्यासाठी सरकारने अत्यंत उपयुक्त अशी सोय उपलब्ध करून दिली आहे. BIS CARE अ‍ॅप या नावाने एक अधिकृत मोबाईल अ‍ॅप सादर करण्यात आलं असून, त्याच्या मदतीने आपण खरेदी केलेल्या सोन्याच्या दागिन्याचं शुद्धतेसह सर्व तपशील तपासू शकतो.

हे पण वाचा : धबधब्याच्या ठिकाणी चार मैत्रिणी फिरायला गेल्या पण क्षणात पाणी वाढलं अन् होत्याच नव्हतं झालं..पाहा अंगावर काटा आणणारा Video

सोनं हे केवळ अलंकार नव्हे तर अनेकांसाठी आर्थिक सुरक्षेचं साधन मानलं जातं. मात्र, या मौल्यवान धातूत थोडाही फसवा प्रकार असेल तर आर्थिक फटका मोठा बसतो. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या भारतीय मानक ब्युरो (BIS) या संस्थेने आता बाजारात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक दागिन्यावर HUID (Hallmark Unique Identification) क्रमांक असणं बंधनकारक केलं आहे.

HUID हा सहा अंकी अल्फान्यूमेरिक कोड असतो. तो दागिन्याच्या शुद्धतेची आणि हॉलमार्किंग केंद्रामार्फत मिळालेल्या प्रमाणपत्राची ओळख दर्शवतो. ग्राहकांनी सोनं खरेदी करताना फक्त वजनावर भर न देता, त्या दागिन्यावर HUID आहे का, याची खात्री करावी.

BIS CARE अ‍ॅप: तुमचं सोनं खरं की खोटं, आता मोबाईलवर तपासा

BIS ने ‘BIS CARE App’ नावाने एक अधिकृत अ‍ॅप विकसित केलं आहे. हे अ‍ॅप गूगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर मोफत उपलब्ध आहे. याचा वापर अगदी सोपा आहे – अ‍ॅप डाऊनलोड करून, नाव व मोबाइल क्रमांक नोंदवून लॉगिन करा. त्यानंतर ‘Verify HUID’ या पर्यायावर क्लिक करा आणि तुमच्या दागिन्यावर कोरलेला HUID नंबर टाका.

तत्काळ त्या दागिन्याची माहिती स्क्रीनवर दिसते – जसे की ज्वेलरचं नाव, हॉलमार्किंग केंद्र, नोंदणी क्रमांक, शुद्धतेचा दर्जा आणि प्रमाणपत्र जारी झाल्याचा दिनांक.

हे पण वाचा : पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मोठा प्लॅन; ‘ही’ खास सुविधा सुरु होणार

या अ‍ॅपमध्ये ग्राहकांसाठी आणखी एक महत्त्वाचा पर्याय म्हणजे ‘Complaints’ विभाग. जर विक्रेत्याने चुकीची माहिती दिली असेल, HUID नंबर बोगस वाटत असेल किंवा सोन्याच्या गुणवत्तेबाबत तक्रार असेल, तर BIS CARE अ‍ॅपद्वारे थेट ऑनलाईन तक्रार नोंदवता येते. यामुळे ग्राहकांना नाहक फसवणुकीपासून संरक्षण मिळतं.

अनेकांना प्रश्न पडतो की, दागिन्यावर हा HUID नंबर कुठे दिसतो? तर हा नंबर BIS हॉलमार्कच्या चिन्हाजवळ, शुद्धता ग्रेडजवळ अगदी सूक्ष्म पद्धतीने कोरलेला असतो. तो सहज नजरेस पडत नाही, पण थोडं निरखून पाहिलं तर तो सापडतो.

Leave a Reply