सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठा धक्का! आज दहा ग्रॅमचा भाव किती? ताजे दर पाहा
Gold Price Today 29 July 2025
Gold Price Today 29 July 2025 : सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी घसरण झाली असून, लग्नसराईपासून ते गुंतवणुकीपर्यंत सर्वसामान्यांपासून गुंतवणूकदारांपर्यंत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 29 जुलै 2025 रोजीच्या घडामोडीनुसार, सोन्याचे दर मुंबई, पुणे, नाशिकसारख्या प्रमुख शहरांमध्ये लक्षणीय घसरले आहेत. गेले काही दिवस सतत चढ-उतार पाहायला मिळाल्यानंतर आज सोनं पुन्हा एकदा सवलतीच्या दरात उपलब्ध होत आहे.
हे पण वाचा : 29 जुलैला ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा, IMD चा यलो अलर्ट जारी!
गेल्या आठवड्यात 23 जुलै रोजी शुद्ध 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,02,330 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी होती. त्यानंतरच्या चार दिवसांत किंमतीत घसरण सुरू झाली. 24 ते 26 जुलैदरम्यान सोनं दररोज खाली येत राहिलं. 27 आणि 28 जुलैला किंमत स्थिर राहिल्यानंतर आज पुन्हा मोठी घसरण नोंदवली गेली आहे.
आज 29 जुलै रोजी सोन्याच्या दरात 18 कॅरेटसाठी 80 रुपये, 22 कॅरेटसाठी 100 रुपये आणि 24 कॅरेटसाठी तब्बल 110 रुपयांची घसरण झाली आहे. म्हणजेच, सोनं खरेदीस इच्छुक असणाऱ्यांसाठी ही वेळ एक सुवर्णसंधी ठरू शकते.
सध्या मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, ठाणे आणि जळगावमध्ये सोन्याचे दर –
18 कॅरेट – ₹74,870 प्रति 10 ग्रॅम
22 कॅरेट – ₹91,500 प्रति 10 ग्रॅम
24 कॅरेट – ₹99,820 प्रति 10 ग्रॅम
तर नाशिक, लातूर, वसई विरार आणि भिवंडीमध्ये किंमती थोड्याशा वेगळ्या असून त्या –
18 कॅरेट – ₹74,900 प्रति 10 ग्रॅम
22 कॅरेट – ₹91,530 प्रति 10 ग्रॅम
24 कॅरेट – ₹99,850 प्रति 10 ग्रॅम
हे पण वाचा : 29 जुलैचे राशीभविष्य: ‘या’ राशींसाठी आजचा दिवस ठरेल वादग्रस्त, नोकरीवर परिणाम?
चांदीबाबत बोलायचं झालं, तर या मौल्यवान धातूमध्ये आज कोणताही बदल झालेला नाही. सलग तिसऱ्या दिवशी चांदीची किंमत स्थिर आहे. मात्र, याआधी 26 जुलै रोजी चांदीच्या किमतीत एकाच दिवशी तब्बल ₹2,000 ची घसरण नोंदवली गेली होती. त्यानंतरच्या दिवसांत ती ₹1,16,000 प्रति किलो या दरावर स्थिर आहे.
23 जुलैला चांदीचा भाव ₹1,19,000 प्रति किलोवर पोहोचला होता. म्हणजेच अवघ्या दोन दिवसांत ₹3,000 ची वाढ नोंदवली गेली होती. पण ती झपाट्याने पुन्हा घसरून 24 जुलैला ₹1,000 ने आणि 26 जुलैला ₹2,000 ने कमी झाली.
