एका आधार कार्डवर किती सिम चालतात? नियम मोडल्यास दंड होऊ शकतो; वाचा सविस्तर माहिती
Aadhaar SIM Limit India
Aadhaar SIM Limit India : मोबाईल फोन आज प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. इंटरनेट, बँकिंग, ओटीपी, सोशल मीडिया – सर्व काही मोबाईलशी जोडलेलं. मात्र, तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या आधार कार्डवर किती सिम कार्ड्स ॲक्टिव्ह आहेत? किंवा दुसरं कोणी तुमच्या नावाने सिम वापरतंय का? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
हे पण वाचा : मोठी बातमी! 8व्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात ‘इतकी’ वाढ होणार
टेलिकॉम विभागाने ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी यासंदर्भात अत्यंत महत्त्वाचा नियम लागू केला आहे. या नियमांनुसार, एका आधार कार्डवर जास्तीत जास्त ९ सिम कार्ड्सच चालू ठेवता येतात. मात्र जम्मू-काश्मीर, आसाम आणि ईशान्य भारतातील राज्यांमध्ये ही मर्यादा ६ सिम कार्ड्सपर्यंतच आहे.
मोबाईल वापरात फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकारने ‘संचार साथी’ (https://sancharsaathi.gov.in) नावाचे पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर जाऊन तुम्ही सहजपणे पाहू शकता की तुमच्या नावावर सध्या किती सिम कार्ड्स सक्रिय आहेत आणि त्यात कोणता नंबर तुम्हाला माहित नसेल तर तात्काळ त्याविरुद्ध तक्रारही दाखल करू शकता.
हे जाणून घेण्यासाठी केवळ तुमचा एक मोबाईल नंबर टाकून OTPच्या मदतीने लॉगिन करावे लागते आणि लगेचच सर्व नंबरची यादी समोर येते. यामध्ये कोणताही अनोळखी किंवा संशयास्पद नंबर आढळल्यास त्याला “This is not my number” हा पर्याय निवडून सहज डिऍक्टिव्ह करता येते. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
टेलिकॉम कायद्याअंतर्गत जर एखाद्या व्यक्तीच्या नावावर ९ पेक्षा जास्त सिम कार्ड्स ॲक्टिव्ह आढळली, तर त्याच्यावर ५० हजार ते २ लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःच्या नावावर किती सिम चालू आहेत याची वेळोवेळी खात्री करणे अत्यंत गरजेचे आहे.
हे पण वाचा : दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा! पहिल्या चाचणीचं वेळापत्रक जाहीर
या पोर्टलवर एकूण सिम कार्ड्सची माहिती देण्याबरोबरच, मोबाईल चोरी झाल्यास तो ब्लॉक करण्याची सुविधा, फसवणुकीची तक्रार करण्याची प्रक्रिया आणि टेलिकॉम फसवणुकीच्या घटनांवर तात्काळ कारवाईसुद्धा केली जाते.
