October 29, 2026

मोठी बातमी! 8व्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात ‘इतकी’ वाढ होणार

0
8th Pay Commission India

8th Pay Commission India

8th Pay Commission India : केंद्र सरकारच्या सेवेत असलेल्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. 8व्या वेतन आयोगाच्या तयारीला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त होत असून, या आयोगाच्या अंमलबजावणीनंतर पगारात तब्बल ३० ते ३४ टक्क्यांची वाढ होऊ शकते. ही वाढ केवळ मासिक पगारापुरती मर्यादित न राहता पेन्शन, भत्ते आणि खरेदीशक्तीवरही थेट परिणाम करणारी ठरणार आहे.

हे पण वाचा : दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा! पहिल्या चाचणीचं वेळापत्रक जाहीर

जानेवारी २०२६ पासून 8व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अद्याप सरकारकडून आयोगासाठी आवश्यक असलेली सेवाशर्ती (Terms of Reference) ठरवण्यात आलेली नाही, तसेच सदस्यांची नियुक्तीही बाकी आहे. त्यामुळे या तारखेला आयोग लागू होईलच, याची खात्री देता येत नाही.

7व्या वेतन आयोगानंतर फारशी मोठी वाढ न झाल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती. त्यावेळी केवळ १४ टक्के वेतनवाढ करण्यात आली होती. मात्र यावेळी 1.83 ते 2.46 या फिटमेंट फॅक्टरचा विचार केला जात आहे. याचा अर्थ असा की, कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात या प्रमाणात वाढ होणार असून, सरासरी ३० टक्क्यांहून अधिक वेतनवाढ अपेक्षित आहे. ही वाढ घरखर्च, कर्जफेड, शिक्षण खर्च यामध्ये गुदमरलेल्या कुटुंबांसाठी एक मोठा श्वास असेल.

तथापि, यामुळे सरकारवर आर्थिक भार देखील वाढणार आहे. अंदाजे १.३ ते १.८ लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च सरकारला सहन करावा लागू शकतो. पण याच वेळी ग्राहक खर्चात वाढ होऊन अर्थव्यवस्थेला गती मिळू शकते, असा विश्वास तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

हे पण वाचा : रेल्वेत तब्बल 1 लाख जागांसाठी मेगाभरती! तरुणांनो सरकारी नोकरीची मोठी संधी चालून आली; वाचा अर्ज कसा करावा?

देशभरात सध्या सुमारे १.१ कोटी केंद्र सरकारी कर्मचारी व पेन्शनधारक आहेत. वेतन आयोगाच्या शिफारशी त्यांच्यासाठी केवळ आर्थिक फायदा न आणता मानसिक स्थैर्यही निर्माण करतील. निवृत्त कर्मचाऱ्यांसाठीही पेन्शन वाढीचा मोठा दिलासा ठरणार आहे.

 

Leave a Reply