1.57 रुपयांवर ट्रेड करणाऱ्या ‘या’ पेनी स्टॉकमध्ये अजून ताकद आहे का? 109% रिटर्ननंतर ‘Hold की Sell?
GTL Infrastructure Share Price
GTL Infrastructure Share Price : भारतीय शेअर बाजारात मंगळवार, 29 जुलै 2025 रोजी सौम्य घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स सुमारे 152 अंकांनी खाली घसरून 80,738 वर स्थिरावला, तर निफ्टी देखील 34 अंकांनी घसरून 24,646 वर बंद झाला. या घसरणीच्या पार्श्वभूमीवर एक पेनी स्टॉक गुंतविकांच्या चर्चेचा विषय ठरतोय – GTL Infrastructure Ltd.
हे पण वाचा : अदानी पॉवर शेअर पुन्हा जोमात! 1500% नफ्यानंतर अजून वाढीचा इशारा
एकेकाळी 3.10 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर गेलेला GTL इन्फ्रास्ट्रक्चरचा शेअर सध्या केवळ 1.57 रुपयांवर ट्रेड होत आहे. मागील वर्षभरात या शेअरमध्ये 47.49% घट झाली असली तरी, काही महिन्यांपूर्वी या स्टॉकने गुंतवणूकदारांना तब्बल 109% परतावा दिला होता. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार सध्या संभ्रमात आहेत – हा शेअर ‘होल्ड’ करावा की विकावा?
आजच्या ट्रेडिंगमध्ये या स्टॉकने दिवसाचा उच्चांक 1.59 रुपये तर नीचांकी 1.54 रुपये गाठला. सत्राच्या सुरुवातीला तो 1.55 रुपयांवर उघडला होता. म्हणजेच, किंमत स्थिर असली तरी त्यातील तेजी किंवा मंदीचा स्पष्ट संकेत मिळालेला नाही.
कंपनीचं सध्याचं मार्केट कॅप 1,998 कोटी रुपये इतकं आहे, म्हणजे अजूनही स्मॉलकॅप कॅटेगरीत येणारी कंपनी. पण गेल्या वर्षभरात याच शेअरची किंमत 3 रुपयांच्या आसपास जाऊन पुन्हा घसरली आहे. त्यामुळे अल्प मुदतीतील ट्रेडर्ससाठी हा स्टॉक सध्या धोकादायक वाटतो आहे.
विश्लेषकांच्या मते, GTL Infrastructure ही कंपनी मोठ्या कर्जाच्या ओझ्याखाली असून तिचा आर्थिक पाया फारसा मजबूत नाही. कंपनीनं मोबाईल टॉवरच्या व्यवसायात प्रवेश केला होता, पण नंतर स्पर्धा वाढल्यामुळे आणि आर्थिक अडचणींमुळे कंपनीला मागे हटावं लागलं.
हे पण वाचा : ₹158 मध्ये शेअर विक्री सुरू! लक्ष्मी फायनान्स IPO मध्ये गुंतवणुकीची मोठी संधी
पण याचवेळी काही तज्ज्ञांचं मत आहे की, दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीने जर कंपनी कर्ज व्यवस्थापन आणि उत्पन्न सुधारण्यात यशस्वी झाली, तर भाव पुन्हा वाढू शकतो. पेनी स्टॉक्समध्ये मोठा जोखीम असतो हे लक्षात घेऊनच निर्णय घ्यावा लागतो.
