October 30, 2026

₹158 मध्ये शेअर विक्री सुरू! लक्ष्मी फायनान्स IPO मध्ये गुंतवणुकीची मोठी संधी

0
Lakshmi India Finance IPO

Lakshmi India Finance IPO

Lakshmi India Finance IPO : लघु व मध्यम व्यवसायांना कर्जपुरवठा करणारी नॉन-बँकिंग वित्तीय संस्था लक्ष्मी इंडिया फायनान्स लिमिटेड (Laxmi India Finance) आपल्या सार्वजनिक समभाग विक्रीच्या (IPO) माध्यमातून बाजारात पदार्पण करत आहे. आजपासून म्हणजेच २९ जुलैपासून हा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खुला झाला असून, ३१ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. बीएसई आणि एनएसई या दोन्ही प्रमुख शेअर बाजारांवर ५ ऑगस्ट रोजी कंपनीचे शेअर्स लिस्ट होणार आहेत.

हे पण वाचा : PNC Infratech ला मोठा खाण प्रकल्प! गुंतवणूकदारांसाठी कमावण्याची सुवर्णसंधी?

या आयपीओचा एकूण आकार सुमारे २५४.२६ कोटी रुपये इतका असून, त्यात नव्या शेअर्सच्या माध्यमातून १६५.१७ कोटी रुपयांचे भांडवल उभारले जाणार आहे. त्याचबरोबर ८९.०९ कोटी रुपये मूल्याच्या ५६.३८ लाख शेअर्सची विक्री ‘ऑफर फॉर सेल’ स्वरूपात होणार आहे. प्रत्येक शेअरची किंमत १५० ते १५८ रुपयांच्या किंमत पट्ट्यात असून, किमान ९४ शेअर्सचा लॉट घ्यावा लागणार आहे.

विशेष बाब म्हणजे, आयपीओ उघडण्याच्या एक दिवस आधीच अँकर गुंतवणूकदारांकडून कंपनीने ७५.५ कोटी रुपये उभारले आहेत. यात ११ संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सहभाग घेतला. त्यामध्ये सान्शी फंड सर्वात मोठा गुंतवणूकदार ठरला असून, त्यांनी एकट्यानेच २० कोटी रुपये गुंतवले आहेत. याशिवाय सेंट कॅपिटल फंड, मिंट फोकस्ड ग्रोथ फंड, बीएनपी परिबास फायनान्शियल मार्केट्स यांसारख्या प्रतिष्ठित गुंतवणूकदारांनी सहभाग नोंदवला आहे.

आयपीओच्या रचनेत ५०% हिस्सा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIB), ३५% हिस्सा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी (Retail) आणि १५% हिस्सा बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) राखीव ठेवण्यात आला आहे.

या सार्वजनिक विक्रीमधून उभारले जाणारे भांडवल कंपनी मुख्यतः नवीन कर्जवाटप, भांडवली गरजांची पूर्तता आणि विकास उद्दिष्टांसाठी वापरणार आहे.

हे पण वाचा : सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठा धक्का! आज दहा ग्रॅमचा भाव किती? ताजे दर पाहा

आर्थिक कामगिरीच्या दृष्टीने लक्ष्मी इंडिया फायनान्सने अलीकडच्या काळात चांगली प्रगती केली आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये कंपनीचा महसूल ४२% नी वाढून २४८ कोटी रुपयांवर पोहोचला असून, निव्वळ नफा तब्बल ६०% नी वाढून ३६ कोटी रुपये झाला आहे. मागील वर्षी तो केवळ २२.४७ कोटी रुपये होता. याच काळात कंपनीने १,१३७ कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले.

 

Leave a Reply