June 19, 2026

पेनी स्टॉकचा मल्टिबॅगर धमाका! ट्रायडेंट शेअर देणार दमदार परतावा

0
Trident Share Price

Trident Share Price

Trident Share Price : शेअर बाजारात सध्या अस्थिरतेचं वातावरण असताना, काही निवडक पेनी स्टॉक्स गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता निर्माण करत आहेत. त्यातच टेक्सटाईल्स क्षेत्रातील नामांकित कंपनी ‘ट्रायडेंट लिमिटेड’चा शेअर चर्चेत आला आहे. अवघ्या ३१ रुपयांच्या आसपास उपलब्ध असलेला हा शेअर लवकरच २० टक्क्यांहून अधिक परतावा देऊ शकतो, अशी शक्यता बाजार विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

हे पण वाचा : साईभक्तांसाठी गोड बातमी! शिर्डीकडे जाणारा प्रवास आता होणार सुलभ; 239 कोटींचा प्रकल्प मंजूर

१८ जुलै २०२५ रोजी भारतीय शेअर बाजारात मोठ्या घसरणीचं चित्र पाहायला मिळालं. बीएसई सेन्सेक्स तब्बल ५०१ अंकांनी घसरून ८१,७५७ अंकांवर बंद झाला, तर निफ्टीही १४३ अंकांनी घसरून २४,९६८ वर स्थिरावला. बँकिंग आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्ये घसरण नोंदवली गेली, तर आयटी निर्देशांक मात्र थोडक्याच फरकाने वधारला. अशा स्थितीत ट्रायडेंटचा शेअर गुंतवणूकदारांच्या नजरेत भरतो आहे.

ट्रायडेंट लिमिटेडचा शेअर शुक्रवारी ३१.९९ रुपयांनी उघडला आणि दिवसभरात ३२.१३ रुपयांचा उच्चांक गाठला. व्यवहाराच्या शेवटी हा शेअर ३१.६१ रुपयांवर बंद झाला. दिवसातील नीचांक ३१.३६ रुपये इतका होता. मागील ५२ आठवड्यांत या शेअरने ४१.४५ रुपयांपर्यंत उंची गाठली होती, तर नीचांकी स्तर २३.११ रुपये राहिला होता.

ही कंपनी कापड, टॉवेल, बेडशीट्स आणि यार्न यांसारख्या उत्पादनांमध्ये कार्यरत आहे. पंजाबमध्ये मुख्यालय असलेल्या ट्रायडेंटने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपले स्थान मजबूत केलं आहे. सध्या कंपनीचे मार्केट कॅप जवळपास १६,००० कोटी रुपयांच्या आसपास असून उत्पादनक्षेत्रात कंपनीचे विविधीकरण सुरू आहे. त्याचबरोबर कंपनीच्या निर्यातीमध्येही स्थिर वाढ दिसून येते आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास अधिक बळकट होत आहे.

हे पण वाचा : जगातील 5 हॉटेल्स जिथे एक रात्र थांबायलाही विकावे लागेल संपूर्ण घरदार

शेअर तज्ज्ञांच्या मते, सध्या ट्रायडेंट लिमिटेडचा शेअर तुलनेने कमी दरात उपलब्ध असून, सध्याच्या स्तरावरून ३८ ते ४० रुपयांपर्यंतचा वाढीचा प्रवास अपेक्षित आहे. त्यामुळे अल्पकालीन किंवा मध्यमकालीन गुंतवणुकीसाठी हा शेअर आकर्षक ठरू शकतो. मात्र, पेनी स्टॉक्समध्ये जोखीम अधिक असते हे लक्षात घेणे गरजेचे आहे. ट्रायडेंटचा शेअर भावी वाढीच्या शक्यतेमुळे चर्चेत आला असला, तरी गुंतवणूक करताना सल्लागाराचा सल्ला घेणे शहाणपणाचं ठरेल.

Leave a Reply

Discover more from Punelive24

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading