October 30, 2026

‘सैयारा’च्या यशामुळे PVR INOXच्या शेअरमध्ये उधळण; गुंतवणूकदार झाले मालामाल!

0
PVR Inox Share Price

PVR Inox Share Price

PVR Inox Share Price : चित्रपटसृष्टीत सध्या एकच नाव गाजतंय – ‘सैयारा’! मोहित सुरी दिग्दर्शित हा सिनेमा सध्या देशभरात प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. प्रेक्षकांचा उसळलेला प्रतिसाद, बॉक्स ऑफिसवरची प्रचंड कमाई आणि सोशल मीडियावर सुरु असलेली चर्चा यामुळे ‘सैयारा’ने एकच धमाका केला आहे. याचा थेट फायदा झाला तो मल्टीप्लेक्स चेन PVR INOX ला.

हे पण वाचा : सेन्सेक्स 327 अंकांनी उसळला, झोमॅटो सुसाट; गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस फायदेशीर?

‘सैयारा’ प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच या चित्रपटाने १०० कोटींचा गल्ला जमवला आहे. पहिल्या तीन दिवसांतच म्हणजे शुक्रवार ते रविवारदरम्यान अनुक्रमे २१, २५ आणि ३७ कोटींची कमाई करत सैयाराने एक मजबूत सुरुवात केली. परिणामी, PVR INOX च्या शेअरमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. सोमवारी या कंपनीचा शेअर १.२८% नी वधारून १,०३२.४५ रुपयांवर बंद झाला. व्यवहारादरम्यान हा शेअर १,०४५ रुपयांच्या उच्चांकावर गेला होता.

मल्टीप्लेक्स उद्योगासाठी गेल्या काही महिने विशेष आव्हानात्मक ठरले होते. अनेक मोठे हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले. पण याच काळात मध्यम बजेटचे चित्रपट, दमदार कथा आणि भावनिक बाजू असलेले चित्रपट चालू लागले आणि मल्टीप्लेक्सला पुन्हा जोर मिळू लागला. याचंच उत्तम उदाहरण ठरला ‘सैयारा’.

2025 च्या पहिल्या सहामाहीत बॉलीवूडनं एकूण ५,७२३ कोटींची कमाई केली. गेल्या वर्षाच्या तुलनेत हे १४ टक्क्यांनी अधिक आहे. यामध्ये टॉप-१० सिनेमांचा वाटा ४४ टक्क्यांवरून ३९ टक्क्यांवर गेला आहे. म्हणजेच, मोठ्या नावांपेक्षा आता प्रेक्षकांची पसंती चांगल्या कथांकडे झुकतेय, मग त्या कुठल्याही भाषेतील असोत.

हे पण वाचा : रिलायन्सचा इतिहासातला सर्वात मोठा नफा, तरी शेअर्स पडले? वाचा नेमकं कारण काय?

प्रादेशिक चित्रपटांचा जोरही या काळात लक्षणीय ठरला आहे. विशेषतः ‘छावा’ या मराठी चित्रपटाने जागतिक पातळीवर ८०९ कोटींची घवघवीत कमाई करत बाजी मारली. त्यानंतर ‘हाऊसफुल ५’, ‘एल२: एमपुराण’, ‘सितारे जमीन पर’ आणि ‘संक्रांतिकी वस्तुनम’ या चित्रपटांनीही २५० कोटींपेक्षा जास्त कमाई केली.

 

Leave a Reply