October 29, 2026

PNC Infratech ला मोठा खाण प्रकल्प! गुंतवणूकदारांसाठी कमावण्याची सुवर्णसंधी?

0
PNC Infratech Share Price Today

PNC Infratech Share Price Today

PNC Infratech Share Price Today : पीएनसी इन्फ्राटेक या इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील दिग्गज कंपनीने नुकत्याच मिळालेल्या दोन मोठ्या प्रकल्पांमुळे शेअर बाजारात चांगलीच झेप घेतली आहे. मंगळवारी या कंपनीच्या शेअरमध्ये तब्बल 5.5 टक्क्यांची वाढ झाली आणि शेअर 314.85 रुपयांवर बंद झाला. या तेजीला कारणीभूत ठरले आहे छत्तीसगडमधील 2,957 कोटींचे खाणकाम कंत्राट आणि राजस्थानातील 239 कोटींचा उड्डाणपूल प्रकल्प.

हे पण वाचा : सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठा धक्का! आज दहा ग्रॅमचा भाव किती? ताजे दर पाहा

छत्तीसगडमधील साउथ ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (SECL), बिलासपूर यांच्याकडून गेवरा कोळसा खाणीच्या विस्तारीकरणासाठी पीएनसी इन्फ्राटेकला काम मिळाले असून कंपनीने या टेंडरमध्ये सर्वात कमी बोली (L1) लावली होती. या प्रकल्पात ओव्हरबर्डन काढणे, सरफेस मायनर्स वापरून कोळसा उत्खनन करणे, लोडिंग व वाहतूक यांचा समावेश आहे. एकूण कंत्राटाची किंमत 2,956.66 कोटी रुपये (GST वगळून) असून कामाचा कालावधी पाच वर्षांचा असेल.

दुसरीकडे, कंपनीला राजस्थानच्या भरतपूर शहरात उड्डाणपूल बांधण्याचेही काम मिळाले आहे. हिरादास चौराहापासून कुम्हेर गेट चौराहा दरम्यान हा पूल बांधला जाणार असून एकूण किंमत आहे 239.94 कोटी रुपये. हे काम EPC मॉडेलवर होणार असून दोन वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. हा प्रकल्प मिळाल्याची अधिकृत घोषणा कंपनीने जून महिन्यातच केली होती.

या दोन्ही महत्त्वाच्या कामांमुळे बाजारात गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला असून पीएनसी इन्फ्राटेकच्या शेअरमध्ये पुन्हा एकदा तेजी दिसून आली आहे. ट्रेन्डलाइननुसार या शेअरचे सरासरी लक्ष्य 388 रुपये असून ही पातळी गाठली तर अजून 30 टक्क्यांची वाढ शक्य आहे. सध्या या शेअरवर लक्ष ठेवणाऱ्या 16 विश्लेषकांपैकी बहुतांशजणांनी ‘स्ट्रॉंग बाय’ सल्ला दिला आहे.

हे पण वाचा : 29 जुलैला ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा, IMD चा यलो अलर्ट जारी!

मात्र, मागील १२ महिन्यांचा विचार करता, या शेअरने 42 टक्क्यांची घसरण अनुभवली आहे. गेल्या वर्षी 29 जुलै 2024 रोजी त्याने 529.80 रुपयांचा उच्चांक गाठला होता. यावर्षी 7 एप्रिलला हा शेअर 235.70 रुपयांपर्यंत खाली गेला होता. मात्र, सध्याची घडामोड पाहता या शेअरला पुन्हा नवसंजीवनी मिळताना दिसत आहे.

Leave a Reply