October 30, 2026

टाटा समूहाच्या TTML शेअरचा मोठा इतिहास! घसरणीनंतर गुंतवणुकीची संधी की धोका?

0
TTML Share Price

TTML Share Price

TTML Share Price : भारतीय शेअर बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर, टाटा ग्रुपची उपकंपनी टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेड म्हणजेच टीटीएमएल याने गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना दिलेला परतावा थक्क करणारा ठरला आहे. तब्बल 1662 टक्क्यांचा रिटर्न देत या शेअरने अनेक लहान गुंतवणूकदारांचे भवितव्य उजळवले आहे.

हे पण वाचा : रिलायन्स इंडस्ट्रीजचा सरप्राइज निकाल! नफ्यात विक्रमी 78% वाढ

सध्या टीटीएमएल चा शेअर बाजारात थोडासा घसरलेला असला, तरी या शेअरच्या मागील कामगिरीने गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा एकदा उत्सुकता निर्माण केली आहे. शुक्रवार, 18 जुलै 2025 रोजी हा शेअर 1.68% नी घसरून 62.99 रुपयांवर बंद झाला. दिवसाची सुरुवात 64.05 रुपयांनी झाली होती आणि ट्रेडिंग दरम्यान त्याने 64.40 रुपयांचा उच्चांक आणि 62.40 रुपयांचा नीचांक गाठला.

टीटीएमएल शेअरची सध्याची रेंज पाहता, 52 आठवड्यांतील उच्चांकी दर 111.4 रुपये, तर नीचांक 50.1 रुपये एवढा आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी ज्यांनी नीचांकी दराने खरेदी केली, त्यांना चांगला परतावा मिळाल्याचे चित्र आहे. सध्या कंपनीचे मार्केट कॅप 12,232 कोटी रुपये इतके असून, टेलिकॉम क्षेत्रातील स्थान पुन्हा एकदा भक्कम करण्याचा टाटा ग्रुपचा प्रयत्न सुरू आहे.

दरम्यान, भारतीय शेअर बाजारातही मोठी घसरण झाली. बीएसई सेन्सेक्स 501 अंकांनी घसरून 81,757 वर, तर निफ्टी 143 अंकांनी घसरून 24,968 वर बंद झाला. निफ्टी बँक निर्देशांकातही जवळपास 546 अंकांची घसरण झाली, तर आयटी निर्देशांकात फारसा बदल झाला नाही.

गेल्या काही वर्षांत टाटा समूहाने डिजिटल आणि टेलिकॉम क्षेत्रात पुन्हा नव्याने पाय रोवण्याचा निर्धार केला आहे. याचाच एक भाग म्हणून टीटीएमएल सारख्या कंपन्यांवर विशेष लक्ष दिले जात आहे. कंपनीने व्यवसाय पुनर्रचनेत सातत्य ठेवले असून, डिजिटल सेवा, एंटरप्राइझ सोल्यूशन्स आणि नवीन तंत्रज्ञानावर भर दिला आहे.

हे पण वाचा : 24.41% घसरणीनंतरही हा PSU स्टॉक फायदेशीर? गुंतवणूकदारांसाठी मोठा संकेत

विशेष म्हणजे, टीटीएमएलमध्ये गुंतवणूक केलेल्या काही रिटेल गुंतवणूकदारांना अल्पकालीन घसरणीचा फटका बसू शकतो, परंतु दीर्घकालीन दृष्टीने विचार केल्यास ही कंपनी स्थिर वाढ दाखवू शकते. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, या कंपनीचा टर्नअराउंड अजून पूर्णपणे संपलेला नाही. भविष्यात यामध्ये आणखी तेजी येण्याची शक्यता आहे.

 

Leave a Reply