पैशाचा पाऊस! सुझलॉन शेअरने दिला जबरदस्त नफा, पुढील टार्गेट उघड
Suzlon Energy Share Price
Suzlon Energy Share Price : भारतीय शेअर बाजारात आज पुन्हा एकदा गुंतवणूकदारांच्या नजरा आकर्षित करणारा शेअर म्हणजे सुझलॉन एनर्जी लिमिटेड. तब्बल १४३२ टक्के परतावा देत या शेअरने मागील काही वर्षांत गुंतवणूकदारांची चांगलीच चांदी केली आहे. बाजारात आज काहीसा नरमावलेला टोन असतानाही सुझलॉनचा शेअर स्थिर असून आगामी काळातही तेजीत राहण्याचे संकेत देतोय.
हे पण वाचा : Jane Street ला भारतीय बाजारात पुन्हा एंट्री, सेबीकडून कडक अटींसह परवानगी
सकाळी बाजार उघडताच सुझलॉनचा शेअर ₹६६.६८ वर ओपन झाला आणि दिवसातील उच्चांक ₹६६.७८ पर्यंत गेला. जरी सत्रात किंचित घसरण झाली असली, तरी शेवटपर्यंत हा शेअर ₹६६.१० वर टिकून राहिला. गेल्या ५२ आठवड्यांच्या तुलनेत हा शेअर सध्या उच्च स्तराजवळ असल्याचे स्पष्ट दिसून येते. सुझलॉनचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ₹८६.०४ असून नीचांकी ₹४६.१५ रुपये आहे.
सध्या कंपनीचे मार्केट कॅप ₹९०,०८६ कोटींच्या घरात पोहोचले आहे. हरित ऊर्जा क्षेत्रातील वाढती मागणी, सरकारकडून नवीकरणीय ऊर्जेला मिळणारा पाठिंबा आणि कंपनीची सुधारणारी आर्थिक स्थिती यामुळे सुझलॉनकडे बाजाराचे विशेष लक्ष केंद्रीत झाले आहे. अनेक ब्रोकरेज फर्म्सने आता या शेअरवर ‘Buy’ रेटिंग दिले असून आगामी महिन्यांसाठी टार्गेट प्राईस ₹८० ते ₹९५ च्या दरम्यान दिला आहे.
सुझलॉन एनर्जी ही भारतातील प्रमुख वायूऊर्जा उत्पादक कंपनी असून, गेल्या काही वर्षांतील कर्जफेड, ऑपरेशनल सुधारणा आणि नवीन प्रोजेक्ट्समुळे कंपनीची छबी बदलली आहे. मागील काही काळात पर्यावरणपूरक गुंतवणुकीकडे कल वाढल्याने सुझलॉनसारख्या कंपन्यांना नवसंजीवनी मिळाली आहे.
हे पण वाचा : सलग 24 दिवस अप्पर सर्किट! ‘हा’ शेअर गुंतवणूकदारांना करत आहे मालामाल
तज्ज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांनी अल्पकालीन चढ-उताराकडे दुर्लक्ष करून दीर्घकालीन दृष्टीने या शेअरचा विचार करावा. अनेक मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांनीदेखील अलीकडेच सुझलॉनमध्ये भागभांडवल वाढवले आहे, हेदेखील कंपनीबाबत बाजारातील विश्वासाचे संकेत मानले जात आहेत.
