PF काढायचंय? नवे नियम वाचा – आता फक्त OTP वर मिळणार पैसे; जाणून घ्या कसं ते?
PF Withdrawal Rules
PF Withdrawal Rules : केंद्र सरकारच्या EPFO अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने नोकरदार वर्गासाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. PF काढण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल करत आता पहिल्यांदा घर घेणाऱ्यांना आपल्या PF खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार आहे. या निर्णयामुळे लाखो नोकरदारांना हक्काचे घर घेणे अधिक सुलभ होणार असून गृहस्वप्न साकार होण्याच्या वाटा खुल्या झाल्या आहेत.
हे पण वाचा : घर गहाण ठेवण्यापूर्वी ‘या’ चुका टाळा, नाहीतर मालमत्ता गमावण्याची वेळ येईल!
कित्येक नोकरदार आपल्या नोकरीच्या सुरुवातीलाच स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न उराशी बाळगतात. मात्र वाढत्या दरांमुळे घर घेण्याच्या प्रक्रियेत अडथळा ठरत होता तो म्हणजे डाउन पेमेंट. या अडचणीवर तोडगा काढत EPFOने PF मधून डाउन पेमेंटसाठी पैसे काढण्याची मुभा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विशेषतः मध्यमवर्गीय नोकरदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नवीन बदलांनुसार, कर्मचारी आता आपल्या PF खात्यातून घर खरेदी, बांधकाम किंवा गृहकर्जाच्या हप्त्यांसाठी एकूण शिल्लक रकमेच्या ९० टक्क्यांपर्यंत रक्कम काढू शकतात. याआधी यासाठी किमान पाच वर्षे सेवा आवश्यक होती, मात्र आता हे कालावधी तीन वर्षांवर आणण्यात आले आहे. एक विशेष बाब म्हणजे आयुष्यात एकदाच या सवलतीचा लाभ घेता येणार आहे.
तसेच ऑनलाइन दाव्याच्या प्रक्रियेलाही अधिक सुलभ करण्यात आले आहे. पूर्वी चेक किंवा पासबुकची सत्यापित प्रत अपलोड करणं बंधनकारक होतं, मात्र आता ही अट रद्द करण्यात आली आहे. कारण PF खाते UAN क्रमांकाशी लिंक असताना बँक खातेदाराचं नाव आधीच पडताळलं जातं. त्यामुळे दाव्याच्या प्रक्रियेला वेग येणार असून गरजूंना वेळेत निधी मिळणार आहे.
बँक खाते अपडेट करण्याची प्रक्रियाही आता अधिक सुलभ झाली आहे. कोणताही कर्मचारी आधार OTP द्वारे आपला नवीन बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड स्वतः अपडेट करू शकतो. यामध्ये नियोक्त्याच्या पडताळणीची गरज उरलेली नाही. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना आपले बँक तपशील बदलणे आता अधिक सोयीचे होणार आहे.
हे पण वाचा : गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! शेअर बाजार सावरला, महागाई घसरणीचा थेट फायदा
याशिवाय, आगाऊ दाव्यांसाठी EPFOने ऑटो-सेटलमेंटची मर्यादा पूर्वीच्या १ लाख रुपयांवरून थेट ५ लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. यामुळे तातडीच्या गरजांसाठी पैसे ७२ तासांच्या आत खात्यावर जमा होतील.
