October 30, 2026

भारतीय नोटांवर गांधीजींचाच फोटो का? RBI ने अखेर उघड केल खरं कारणं!

0
RBI Gandhi Photo Reason

RBI Gandhi Photo Reason

RBI Gandhi Photo Reason : भारतीय चलनी नोटांवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो छापण्यात येतो, हे आपण सर्वजण जाणतो. पण अनेकदा सामान्य नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो—‘फक्त गांधीजींचाच फोटो का? देशाच्या इतर थोर नेत्यांचे, संतांचे किंवा शास्त्रज्ञांचे फोटो का नाहीत?’ या प्रश्नाचं उत्तर अखेर स्वतः भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) दिलं असून, त्यामागील विचारसरणी स्पष्ट केली आहे.

हे पण वाचा : अभिनेत्री प्रियांका चोप्राने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; चाहत्यांसाठी मोठा खुलासा

‘आरबीआय अनलॉक्ड: बियॉन्ड द रुपी’ या डॉक्युमेंट्रीतून ही माहिती समोर आली आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, एकसंधता आणि सहज ओळख हे चलनी नोटांच्या डिझाइनमधील महत्त्वाचे घटक आहेत. जर नोटांवर वेगवेगळ्या व्यक्तींचे फोटो असतील, तर त्याने नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता वाढते. बनावट नोटा ओळखणंही कठीण होऊ शकतं. त्यामुळे महात्मा गांधींचाच फोटो सर्व नोटांवर छापण्याचा निर्णय घेण्यात आला.

विशेष म्हणजे, नोटांवर कोणाचा फोटो असावा याबाबत आरंभिक चर्चांमध्ये रवींद्रनाथ टागोर, मदर तेरेसा, डॉ. अबुल कलाम आझाद यांच्यासह इतर थोर विभूतींच्या नावांचा विचारही करण्यात आला होता. मात्र अखेरीस महात्मा गांधी यांचं व्यक्तिमत्त्व, देशासाठी दिलेलं योगदान आणि सर्वसामान्यांमधील लोकप्रियता लक्षात घेता त्यांचाच फोटो छापण्याचा निर्णय घेण्यात आला.

स्वातंत्र्यपूर्व काळात मात्र चित्र काहीसं वेगळं होतं. ब्रिटिश राजवटीच्या काळात चलनावर वाघ, हत्ती, हरीण, तसेच सम्राटाचे चित्र छापलं जात असे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्या काही नोटांवर अशोक स्तंभातील सिंह, ऐतिहासिक स्थळं, आणि विज्ञान व शेती क्षेत्रातील प्रगती दर्शवणाऱ्या दृश्यांचाही समावेश होता.

हे पण वाचा : शेअर बाजार कोसळतोय, पण बिटकॉइन झेप घेतोय; जाणून घ्या कारण?

१९६९ साली गांधीजींच्या जन्मशताब्दीनिमित्त पहिल्यांदा त्यांच्या छायाचित्रासह १०० रुपयांची नोट प्रकाशित करण्यात आली. यात सेवाग्राम आश्रमाचाही फोटो होता. नंतर १९८७ मध्ये ५०० रुपयांची नोट आली आणि त्या वर्षीपासून सर्व चलनी नोटांवर गांधीजींचं छायाचित्र असणं ही एक परंपरा झाली.

 

 

Leave a Reply