October 30, 2026

अभिनेत्री प्रियांका चोप्राने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; चाहत्यांसाठी मोठा खुलासा

0
Priyanka Chopra Comeback

Priyanka Chopra Comeback

Priyanka Chopra Comeback : बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा मोठ्या परफॉर्मन्ससाठी सज्ज झाली आहे. गेल्या काही वर्षांत खासगी आयुष्य आणि आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्समुळे बॉलिवूडपासून दूर राहिलेली प्रियांका आता पुन्हा एकदा भारतीय चित्रपटसृष्टीत दमदार पुनरागमन करत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

हे पण वाचा : शेअर बाजार कोसळतोय, पण बिटकॉइन झेप घेतोय; जाणून घ्या कारण?

यंदा तिचं नाव थेट दोन मोठ्या प्रकल्पांशी जोडलं जात आहे – एस. एस. राजामौली दिग्दर्शित साऊथ सुपरस्टार महेश बाबूसोबतचा अ‍ॅक्शन-ड्रामा ‘SSMB29’ आणि बॉलिवूडमधील बहुचर्चित सुपरहीरो फ्रँचायझी ‘क्रिश ४’.

हैदराबादमध्ये झालेल्या एका गुप्त शूटिंग दरम्यान प्रियांकाने ‘SSMB29’ मध्ये आपली भूमिका पूर्ण केल्याची माहिती समोर आली आहे. या चित्रपटात तिची भूमिका केवळ सौंदर्यवर्धक नसून कथानकाच्या केंद्रस्थानी असणार असल्याचेही कळते. विशेष म्हणजे, या प्रोजेक्टसाठी तिने तब्बल ३० कोटी रुपये मानधन घेतल्याची माहिती आहे. ही रक्कम जर खरी ठरली, तर प्रियांका दीपिका पदुकोणलाही मागे टाकत सर्वाधिक मानधन घेणारी भारतीय अभिनेत्री ठरणार आहे. मात्र यावर अद्याप प्रियांका किंवा निर्मात्यांनी अधिकृत घोषणा दिलेली नाही.

दुसरीकडे, ‘क्रिश ४’ मध्ये प्रियांकाची पुनरागमनाची शक्यता चाहत्यांमध्ये कमालीचा उत्साह निर्माण करत आहे. २००६ साली ‘क्रिश’ चित्रपटात तिची झळकलेली भूमिकाच पुन्हा एकदा पुढे नेण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. हृतिक रोशनने यावेळी स्वतः दिग्दर्शनाची धुरा सांभाळण्याचा विचार केल्याचे समजते. यामुळे ‘क्रिश’ फ्रँचायझी नव्या रुपात आणि नव्या दृष्टिकोनातून प्रेक्षकांसमोर येईल, याबाबत शंका नाही.

हे पण वाचा : जुना मोबाईल फेकण्याआधी थांबा! तुमच्याच हातात लपलंय सोनं – कसं ते वाचा?

या सिक्वेलमध्ये रेखा आणि प्रीती झिंटा यांचंही पुनरागमन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर हे खरे ठरले, तर ‘क्रिश ४’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी केवळ अ‍ॅक्शनचा डोस नसून भावनांची पर्वणी ठरेल.

प्रियांकाने मागील काही वर्षांत आपल्या कुटुंबावर लक्ष केंद्रित केले होते. लेक मालतीच्या जन्मानंतर तिने अनेक बॉलिवूड प्रोजेक्ट्सना नकार दिला होता. मात्र आता तिच्या कारकिर्दीचा नवीन अध्याय सुरु होतोय, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

Leave a Reply