बाजारात पुन्हा विश्वासाचे वारे! आज कोणते शेअर्स झळकले? वाचा संपूर्ण रिपोर्ट
Indian Stock Market Today
Indian Stock Market Today : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी गुरुवारी सकाळी सुखद बातमी आली. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत, अमेरिकेतील महत्त्वाच्या व्यापार निर्णयांचा परिणाम आणि देशांतर्गत कंपन्यांचे तिमाही निकाल यामुळे भारतीय शेअर बाजाराने सलग दुसऱ्या दिवशी हिरव्या रंगात वाटचाल सुरू ठेवली आहे.
हे पण वाचा : सगळं उलटलं! Tesla शेअर्स कोसळले, Elon Musk यांना मोठा आर्थिक फटका
गुरुवारी सकाळी प्री-ओपनिंग सत्रात सेन्सेक्सने 53.31 अंशांनी वाढ नोंदवत 82,779.95 वर सुरुवात केली, तर निफ्टी 23.40 अंश वाढून 25,243.30 वर उघडला. मागील काही दिवसांच्या पडझडीनंतर ही सतत दुसरी तेजीची नोंद आहे आणि त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये नवीन आशा निर्माण झाली आहे.
भारतीय बाजारात ही सकारात्मक सुरुवात होण्यामागे प्रमुख कारण म्हणजे अमेरिका आणि जपानमधील नव्या व्यापार करारांची घोषणा. यामुळे केवळ अमेरिकी शेअर बाजारच नव्हे, तर जपान, दक्षिण कोरिया, चीन, हाँगकाँगसारख्या आशियाई बाजारातही तेजीत वाढ झाली आहे. डाउ जोन्सने काल 507 अंकांची उसळी घेतली, तर नॅसडॅक आणि एस अँड पी 500 हे निर्देशांकही उंचावले. जागतिक बाजारातील या सकारात्मक वातावरणाचा थेट परिणाम मुंबई शेअर बाजारावर झाला.
याचबरोबर, सध्या सुरू असलेला तिमाही निकालांचा हंगामही गुंतवणूकदारांसाठी निर्णायक ठरतोय. टाटा कंझ्युमर, डॉ. रेड्डीज, एसबीआय लाईफ, बजाज फायनान्स आणि नेस्ले या कंपन्यांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. या कंपन्यांच्या कामगिरीबाबत बाजारात सकारात्मक अपेक्षा आहेत. चांगले निकाल हे बाजाराला आणखी बळ देऊ शकतात.
हे पण वाचा : शेअर बाजार घसरतोयच! शुक्रवारीही बाजारात मोठी घसरण; गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण
अमेरिकेने ब्रिटनसोबतच्या मुक्त व्यापार कराराच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. भारतालाही याचा अप्रत्यक्ष फायदा होऊ शकतो, कारण जागतिक व्यापार साखळीत स्थिरता आली तर भारतीय कंपन्यांच्या निर्यातीला चालना मिळू शकते.
गिफ्ट निफ्टीमध्ये देखील सौम्य तेजीची नोंद झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आजचा दिवस सकारात्मकतेने पाहण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, गुरुवार हा निफ्टी विकली एक्सपायरीचा दिवस असल्याने काही प्रमाणात चलाखीने व्यवहार होतील, मात्र एकंदर बाजाराचा मूड सध्या ‘बुलिश’ दिसतो.
