October 31, 2026

20 रुपयांवर येस बँक शेअर! आता खरेदी करावी की विक्री? वाचा तज्ञांचा सल्ला

0
Yes Bank Share Price

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price : भारतीय शेअर बाजारात बुधवारी (16 जुलै 2025) सौम्य नकारात्मक सुरुवात झाली असून, येस बँक लिमिटेडच्या शेअरने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले आहे. बँकेच्या शेअरमध्ये सौम्य घसरण नोंदवली गेली असून, काही तांत्रिक विश्लेषकांनी या स्टॉकबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

हे पण वाचा : पुणेकरांसाठी ब्रेकिंग न्यूज – तुमच्या भागात येणार नवं पोलीस ठाणं? वाचा महत्वाची माहिती

आजच्या व्यवहारात येस बँकचा शेअर 20.53 रुपयांवर उघडला, मात्र थोड्याच वेळात -0.29 टक्क्यांची घसरण नोंदवत 20.4 रुपयांवर स्थिरावला. दिवसाच्या व्यवहारात या शेअरने 20.56 रुपयांचा उच्चांक आणि 20.34 रुपयांचा नीचांक गाठला. ही मर्यादित किंमत रेंज असून, स्टॉक काहीसा दबावाखाली असल्याचे संकेत मिळत आहेत.

गेल्या 52 आठवड्यांचा विचार करता, येस बँक शेअरने 27.2 रुपयांचा उच्चांक आणि 16.02 रुपयांचा नीचांक गाठलेला आहे. सध्या येस बँकचे मार्केट कॅप सुमारे 63,958 कोटी रुपये इतके आहे. अशा स्थितीत काही ब्रोकिंग फर्म्सनी या स्टॉकमधील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

येस बँकने मागील काही तिमाहींमध्ये आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी प्रयत्न केले असले, तरीही या बँकेच्या कर्ज वितरण धोरणावर आणि संभाव्य गैरवसुलीच्या जोखमीवर विश्लेषक सतत बोट ठेवत आहेत. यामुळेच स्टॉकमध्ये अपेक्षित तेजी दिसून येत नाही. ताज्या आकडेवारीनुसार बँकेची स्थिती तुलनेने सुधारली असली तरी गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास पूर्णतः परतलेला नाही.

हे पण वाचा : ‘या’ पेनी स्टॉकमध्ये जबरदस्त उसळी! टार्गेट प्राईस थेट ३० रुपयांच्या दिशेने

शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांकांबाबत बोलायचं झालं, तर आज सेन्सेक्स 95 अंकांनी घसरून 82,474.99 वर तर निफ्टी 37 अंकांनी घसरून 25,158.55 वर बंद झाला. मात्र, निफ्टी बँक आणि आयटी निर्देशांकांमध्ये सौम्य वाढ दिसून आली. येस बँक शेअर या पार्श्वभूमीवर काहीसे नकारात्मक भावात ट्रेड करताना दिसला.

या शेअरमध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करणाऱ्यांसाठी अद्यापही स्पष्ट सिग्नल नाही. अल्पकालीन गुंतवणूकदारांनी मात्र स्टॉपलॉससह व्यवहार करणे अत्यंत आवश्यक ठरेल. बँकेच्या ताज्या तिमाही निकालांवर आणि व्यवस्थापनाच्या पुढील दिशानिर्देशांवर शेअरच्या पुढील चढउतारांचे गणित ठरेल, असं मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

Leave a Reply