June 13, 2026

पुणेकरांनो खबरदारी घ्या! १७ जुलैला ‘या’ भागांत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद

0
Pune Water Cut

Pune Water Cut

Pune Water Cut : पुणे शहराच्या मध्य, पश्चिम आणि दक्षिण भागातील लाखो पुणेकरांना गुरुवार, १७ जुलै २०२५ रोजी मोठ्या पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातून मुख्य शहरात पाणी आणणाऱ्या मोठ्या जलवाहिनीत गळती आढळल्याने गुरुवारी दिवसभर या लाईनची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे अनेक भागांचा पाणीपुरवठा संपूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

हे पण वाचा : 20 रुपयांवर येस बँक शेअर! आता खरेदी करावी की विक्री? वाचा तज्ञांचा सल्ला

दुरुस्तीची कामे गुरुवारी सुरू राहतील, मात्र त्याचा परिणाम शुक्रवार, १८ जुलै रोजीही जाणवणार आहे. त्या दिवशी सकाळी पाणी उशिरा आणि कमी दाबाने येईल. परिणामी, नागरिकांच्या दैनंदिन कामांवर आणि गरजांवर त्याचा थेट परिणाम होणार आहे. यासाठी महापालिकेने नागरिकांना पुरेसं पाणी साठवून ठेवण्याचे आणि ते जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.

पाणीपुरवठा बंद राहणाऱ्या भागांमध्ये पर्वती, सहकारनगर, बिबवेवाडी, मुकुंदनगर, डेक्कन, शिवाजीनगर, स्वारगेट, कोथरूड, वारजे, बावधन, पाषाण, बाणेर, औंध, वडारवाडी, जनवाडी, भोसलेनगर, चतुःश्रृंगी, कर्वेनगर, बालेवाडी, चांदणी चौक, एनडीए रस्ता, तपोधाम, शिवणे, हिंगणे होम कॉलनी, विजयनगर, शास्त्रीनगर, सुतारदरा आणि जुने वारजे यांचा समावेश आहे. हे सगळेच भाग घनदाट लोकवस्तीचे असून, या निर्णयाचा परिणाम हजारो घरांवर, शाळांवर, दवाखान्यांवर आणि व्यावसायिक आस्थापनांवर होणार आहे.

हे पण वाचा : पुणेकरांसाठी ब्रेकिंग न्यूज – तुमच्या भागात येणार नवं पोलीस ठाणं? वाचा महत्वाची माहिती

या पार्श्वभूमीवर, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने काही उपाययोजना आखल्या आहेत. अत्यावश्यक भागांमध्ये टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जाईल. तर काही ठिकाणी जलपंप केंद्रांमार्फत तात्पुरती व्यवस्था केली जाणार आहे. यासोबतच नागरिकांना माहिती मिळावी म्हणून महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि सोशल मीडियावर वेळोवेळी अपडेट्स दिले जातील.

Leave a Reply

Discover more from Punelive24

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading