तारक मेहता शोमधून बबिताच एक्झिट? अभिनेत्रीचा स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाली…
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : प्रसिद्ध टीव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधून बबिता म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ता ही एक्झिट घेणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून जोर चढला होता. सोशल मीडियावरही या संदर्भात विविध पोस्ट व्हायरल होत होत्या. अखेर स्वतः मुनमुन दत्तानेच या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर करत तिने स्पष्ट सांगितलं की, “प्रत्येक अफवा खरी नसते.”
या व्हिडीओमध्ये बबिताचं घर आणि मालिकेचं शूटिंग सुरू असल्याचं स्पष्टपणे दिसतं. यावरूनच तिनं ‘तारक मेहता…’मध्ये तिची भूमिका कायम असल्याचा संदेश चाहत्यांना दिला आहे.
गेल्या १५ वर्षांपासून ‘तारक मेहता…’ ही मालिका प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे. जिथे जेठालाल, टप्पू आणि दया यांच्यासारख्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात घर करून बसल्या आहेत, तिथेच बबिताही तिच्या सौंदर्याने आणि शांत, सुसंस्कृत स्वभावामुळे प्रेक्षकांची लाडकी ठरली आहे.
हे पण वाचा : काय सांगता? पुण्यात कुत्र्यामुळे थांबले विमानाचे लँडिंग; वाचा नेमकं काय घडलं?
मुनमुन दत्ता गेली अनेक वर्षं या मालिकेत कार्यरत असून, ती शोमधून अचानक एक्झिट घेणार असल्याचं ऐकून तिचे चाहते खूपच चिंतेत होते. सोशल मीडियावर तिच्या या निर्णयामुळे नाराजी व्यक्त करणाऱ्या पोस्टही दिसत होत्या. पण तिने शेअर केलेल्या व्हिडीओमुळे चाहत्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
