October 29, 2026

पुणे महानगरपालिकेला गरीब कुटुंबियांना द्यावे लागले ११ लाख रुपये, न्यायालयाने दिले आदेश; नेमकं कारण काय?

0
Pune Municipal Corporation

Pune Municipal Corporation

Pune Municipal Corporation : कसबा पेठ येथील एका दुर्लक्षित घटनेत बारावर्षीय मुलाचा शौचालयाच्या पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाला आणि आता पुणे महानगरपालिकेला याची मोठी किंमत चुकवावी लागली आहे. या दुर्घटनेप्रकरणी दिवाणी न्यायाधीश विक्रमसिंग भंडारी यांनी मनपावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत पीडित कुटुंबाला ११ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला आहे. ही घटना केवळ अपघात नव्हती, तर एक प्रशासनाच्या दुर्लक्षाची भीषण परिणती होती.

हे पण वाचा : काय सांगता? पुण्यात कुत्र्यामुळे थांबले विमानाचे लँडिंग; वाचा नेमकं काय घडलं?

ही दुर्दैवी घटना ९ एप्रिल २०१८ रोजी कसबा पेठ परिसरात घडली होती. तुषार बाबू रामोशी हा बारावर्षीय मुलगा रात्रीच्या सुमारास शौचासाठी गेला होता. बराच वेळ उलटूनही तो परतला नाही. शोधाशोध केल्यानंतर तो शौचालयाच्या पाण्याच्या टाकीत बुडालेल्या अवस्थेत आढळून आला. तत्काळ दवाखान्यात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी पाण्यात गुदमरल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.

तुषारचे वडील बिगारी काम करतात तर आई मोलकरीण आहे. या गरीब कुटुंबाने मोठ्या धाडसाने पुणे महानगरपालिका, आयुक्त, बांधकाम व आरोग्य विभागाविरोधात हलगर्जी आणि कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप करत दावा दाखल केला. ॲड. अमित राठी व ॲड. पूनम मावाणी यांच्या माध्यमातून न्यायालयात लढा दिला. त्यांना ॲड. आदित्य जाधव व ॲड. प्राची जोग यांचे सहकार्य मिळाले.

हे पण वाचा : पुणेकरांना ५० लाखांच्या आतली घरंच का हवीत? जाणून घ्या घर खरेदीतील नवा ट्रेंड!

तुषारच्या मृत्यूनंतर कुटुंबाने न्यायालयासमोर सादर केलेल्या आकडेवारीनुसार, रुग्णालय खर्च, अंत्यसंस्कार व मानसिक वेदना या सगळ्यांचा विचार करून ५१ लाख रुपयांची नुकसानभरपाई मागितली होती. मात्र, मुद्रांक शुल्क भरायची आर्थिक क्षमता नसल्यामुळे, त्यांनी ११ लाख रुपयांवर १२ टक्के व्याजासह भरपाईची मागणी केली. न्यायालयाने ही मागणी मान्य केली आणि महानगरपालिकेला दोषी ठरवत आदेश दिला.

Leave a Reply