June 17, 2026

‘या’ वासाने साप 100 किलोमीटर दूर जातात! पावसाळ्यात ‘हाच’ आहे रामबाण उपाय; वाचा सविस्तर

0
Monsoon Snake Safety

Monsoon Snake Safety

Monsoon Snake Safety : पावसाळा आला की निसर्गाचे रूप पालटते, पण याच ऋतूमध्ये एक मोठा धोका वाढतो – सापांचा! या काळात ओलसर जमिन, वाढलेली झाडंझुडपं, आणि अन्नाचा शोध घेणारे साप आपल्याच घराच्या, अंगणाच्या परिसरात शिरकाव करतात. विशेषतः ज्या घरांजवळ बाग आहे, किंवा गवत असते, तिथे सापांची वर्दळ अधिक असते. त्यामुळे लहान मुलांना खेळताना सापाचा धोका वाटतो, आणि घरातील मंडळी कायम चिंतेत राहतात.

हे पण वाचा : ‘हा’ देश संपूर्ण उद्धवस्त होणार, बाबा वेंगाच्या धक्कादायक भविष्यवाणीने सगळेच हादरले

पण आता घाबरण्याची गरज नाही. तुमच्या घरातच अशा काही गोष्टी आहेत, ज्यांचा वास सापांना इतका असह्य वाटतो की त्या जागेपासून ते कोसों दूर जातात. कोणताही मोठा खर्च न करता तुम्ही हे उपाय घरच्या घरी करू शकता, आणि संपूर्ण पावसाळा सर्पमुक्त राहू शकता.

नॅप्थॅलिन गोळ्या हे सर्पहट्टासाठी प्रसिद्ध घरगुती उपाय आहेत. त्या गोळ्या कुटून त्यांची पूड करून थोड्याशा पाण्यात मिसळा आणि तयार द्रावण झाडांजवळ, खिडक्या-दारांजवळ शिंपडा. याचा तीव्र वास सापांना अजिबात सहन होत नाही.

अमोनिया देखील सापांना असह्य वाटणारा वास आहे. दोन चमचे अमोनिया थोड्या पाण्यात मिसळून स्प्रे करून बाग, खिडक्या आणि अंगणात फवारणी केली, की साप तो परिसर टाळतात.

लवंग आणि दालचिनी तेल यांचे मिश्रण सुद्धा प्रभावी ठरते. त्याचा वास सापांना इतका त्रासदायक वाटतो की ते तिथून लगेच निघून जातात. हे तेल पाण्यात मिसळून स्प्रे केल्यास ते संपूर्ण परिसरात सुगंधासारखं पसरतं, पण सापांसाठी तो ‘संधानाशक’ ठरतो.

लसूण आणि कांद्याचे तेलही यासाठी उत्तम. त्याचा वास दरवाज्यांजवळ लावल्यास साप घरात शिरण्याचा विचारही करत नाहीत. याशिवाय कडुलिंबाच्या पानांचा चुरा करून अंगणात टाकल्यासही साप दूर राहतात.

हे पण वाचा : वीजबिलात मोठा झटका! ५०० युनिट वापरल्यास आता मोजावे लागतील ‘इतके’ रुपये

काही लोक घराबाहेर जुन्या टायरचे तुकडे किंवा प्लास्टिकच्या बाटल्या टाकतात, ज्यामुळे साप सरपटतांना पकड घेऊ शकत नाहीत आणि ते तिथून पळतात. तर काही ठिकाणी मोहरी (राई) चे दाणे बाहेर पसरवले जातात – याचा वासही सापांना फारसा रुचत नाही.

हे सर्व उपाय आजमावले, तर घराच्या आसपास साप येण्याची शक्यता खूपच कमी होते. मात्र, जर साप घरात शिरला असेल किंवा दिसला, तर तात्काळ वनविभाग किंवा आपत्कालीन सेवेला कळवणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Discover more from Punelive24

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading