October 29, 2026

हडपसर-यवत, चाकण महामार्ग रुंदीकरणाला गती; तब्बल ६२५० कोटींचा निधी जाहीर!

0
Hadapsar Yavat Highway

Hadapsar Yavat Highway

Hadapsar Yavat Highway : पुणे जिल्ह्यातील लाखो नागरिकांसाठी आणि उद्योजकांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आली आहे. हडपसर-यवत आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर या दोन महत्त्वाच्या महामार्गांच्या रुंदीकरणाला अखेर गती मिळाली असून महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळामार्फत (MSRDC) तब्बल ६,२५० कोटी रुपये खर्चाच्या निविदा जाहीर करण्यात आल्या आहेत.

हे पण वाचा : ‘या’ वासाने साप 100 किलोमीटर दूर जातात! पावसाळ्यात ‘हाच’ आहे रामबाण उपाय; वाचा सविस्तर

पुणे शहराच्या पूर्वेकडील भागातील सततच्या वाहतूक कोंडीला आणि अपुऱ्या रस्त्यांच्या त्रासाला आता काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने या प्रकल्पांना प्राधान्यक्रम दिला असून, दोन टप्प्यांत ही कामं होणार आहेत.

हडपसर-यवत महामार्गासाठी ३,१४६ कोटींची निविदा तर तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गासाठी ३,१२३ कोटींची निविदा जाहीर झाली आहे. चाकणपर्यंतचा रस्ता चारपदरी आणि पुढे सहापदरी असा असेल. या रस्त्यांच्या रुंदीकरणामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड, लोणी काळभोर, शिक्रापूर, तळेगाव, चाकण, यवत या भागांतील प्रवाशांना आणि स्थानिकांना मोठा दिलासा मिळेल.

औद्योगिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या चाकण, तळेगाव आणि शिक्रापूर परिसरात वाहनांची संख्या झपाट्याने वाढते आहे. आयटी कंपन्या, वाहन उद्योग, वेअरहाऊसेस आणि निवासी वसाहती झपाट्याने वाढत असल्यामुळे वाहतूक कोंडी मोठा प्रश्न बनला आहे. याशिवाय अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.

हे पण वाचा : ‘हा’ देश संपूर्ण उद्धवस्त होणार, बाबा वेंगाच्या धक्कादायक भविष्यवाणीने सगळेच हादरले

या रस्त्यांच्या रुंदीकरणामुळे फक्त वाहतुकीचा प्रश्न सुटणार नाही, तर औद्योगिक गुंतवणुकीसाठीही पोषक वातावरण निर्माण होणार आहे. वेळ वाचेल, इंधनाची बचत होईल आणि लॉजिस्टिक साखळी अधिक सक्षम होईल. त्यामुळे संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या दळणवळण व्यवस्थेत मोठा बदल घडून येईल.

स्थानिक नागरिक, नगरसेवक, आमदार आणि उद्योजकांकडून या कामांना लवकरात लवकर सुरुवात व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होताच कामांना वेग दिला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Leave a Reply