शिवलिंगावर कधीच अर्पण करू नयेत ‘या’ ५ गोष्टी – जाणून घ्या धार्मिक कारण?
Shravan Puja
Shravan Puja : श्रावण महिना म्हणजे भक्ती, भावनेचा आणि शुद्ध आस्थेचा काळ. या महिन्यात भगवान महादेवाची आराधना करणाऱ्या भक्तांची संख्या प्रचंड असते. शिवमंदिरांमध्ये रांग, बेलपत्र, जलाभिषेक, हर हर महादेवचा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात सारा परिसर न्हाऊन निघतो. मात्र, श्रद्धेच्या भरात काही गोष्टी नकळतपणे चुकीच्या पद्धतीने केल्या जातात, ज्यामुळे पूजेचा उद्देश भंग पावतो आणि त्याचे अशुभ परिणामही भोगावे लागू शकतात.
हे पण वाच : फक्त ५% व्याजदरात ३ लाखांचे कर्ज! सरकारची विश्वकर्मा योजना तुम्हाला माहिती आहे का?
शिवलिंग हे केवळ एक धार्मिक प्रतीक नसून ब्रह्मांडातील ऊर्जा आणि तत्त्वज्ञानाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे त्याची पूजा करताना काही विशेष गोष्टींपासून दूर राहणे गरजेचे आहे. धार्मिक ग्रंथांमध्ये याविषयी स्पष्ट नियम सांगितले गेले आहेत.
सर्वप्रथम, हळद वापरण्याचा विषय. हळद ही सौंदर्य आणि सौभाग्याचे प्रतीक आहे. ती देवींच्या पूजेसाठी उपयुक्त मानली जाते. परंतु महादेव हे त्याग, वैराग्य आणि निवृत्तीचे प्रतीक आहेत. म्हणूनच शिवलिंगावर हळद अर्पण करणे हे शास्त्रविरुद्ध मानले जाते.
तसेच, कुंकू देखील शिवलिंगावर चढवू नये. कुंकवाचा संबंध स्त्रियांच्या सौभाग्याशी जोडलेला असतो. महादेवांचा स्वरूप मात्र विरक्त असून, ते औघड आणि तपस्वी देव मानले जातात. म्हणूनच शिवलिंगावर कुंकू लावणे हे पूजेच्या नियमात बसत नाही.
यासोबतच, अनेक भक्त तुळशीची पाने अर्पण करतात, पण ती देखील शिवपूजेसाठी वर्ज्य मानली गेली आहेत. काही पुराणांनुसार, महादेवांनी तुलसी देवीच्या नवऱ्याचा वध केल्यामुळे ती शिवपूजेसाठी निषिद्ध ठरली आहे. त्यामुळे श्रावणातील शिवपूजेत तुळशीचे पान अर्पण केल्यास पूजेमागचा हेतू फोल ठरतो.
पुढे, तुटलेला तांदूळ हा देखील पूजेसाठी अपवित्र मानला जातो. शिवलिंगावर अख्खे, स्वच्छ, न तुटलेले तांदळाचे दाणेच अर्पण करावेत, असे शास्त्र सांगते. कारण तुटलेला तांदूळ हे दुर्लक्ष, अपूर्णता आणि अपवित्रतेचे प्रतीक मानले जाते.
या सर्व बाबी छोट्या वाटल्या तरी शास्त्रानुसार त्यांचा प्रभाव मोठा असतो. केवळ विधीने पूजा करून समाधान न मानता, त्यामागील आचारसंहिता आणि नियम समजून घेणे हेच खरे भक्तीचे लक्षण आहे.
