उद्याचा दिवस अत्यंत महत्वाचा! ‘या’ राशींसाठी नशिबाचा खेळ बदलणार! वाचा कोणत्या आहेत त्या?
Saturn Retrograde 2025 Effects
Saturn Retrograde 2025 Effects : १३ जुलै २०२५… एक अशी तारीख ज्यावर ज्योतिषशास्त्रातील जाणकारांचे विशेष लक्ष आहे. या दिवशी शनिग्रहाची उलटी चाल — म्हणजेच ‘शनि वक्री’ — सुरू होत आहे. सकाळी ७:२४ वाजता शनि आपल्या चालीत बदल करत मीन राशीतून वक्री होणार आहे आणि तब्बल साडेचार महिन्यांनी म्हणजे २८ नोव्हेंबरला पुन्हा मार्गी येईल. हा काळ, ज्याला काही जण ‘जायंट किलर फेज’ म्हणूनही संबोधतात, तो काही राशींसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
ज्योतिषशास्त्रात शनि हा कर्म, न्याय आणि विलंबाचा ग्रह मानला जातो. पण त्याचबरोबर तो कठोर परिश्रमाचे फळ देणारा आणि जीवनात शिस्त आणणारा ग्रहही आहे. त्यामुळे शनी वक्री होतो तेव्हा काही राशींना पूर्वी केलेल्या मेहनतीचं फळ मिळायला सुरुवात होते. या वक्री काळात विशेषतः वृषभ, मकर, मीन, कर्क आणि सिंह या राशींना प्रगती, संपत्ती, आरोग्य व करिअरच्या क्षेत्रात मोठे बदल अनुभवायला मिळणार आहेत.
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ जुनी अडथळ्यांची निवारण करणारा ठरेल. व्यवसायात नवे मार्ग उघडतील. जुनी कर्जं फेडली जातील. कुटुंबात शांतता येईल आणि वैवाहिक जीवनात सुसंवाद वाढेल.
मकर राशीवर तर शनिची साडेसाती असली, तरी शनी त्यांच्या राशीचा स्वामी असल्यामुळे वक्री स्थितीतही मदतीला धावतो. नोकरीत बढती, अडकलेली सरकारी कामं मार्गी लागणे, आणि आर्थिक स्थैर्य मिळवणं — हे सर्व शक्य होईल.
मीन राशीमध्ये सध्या शनि स्थिर आहे आणि तेथूनच वक्री होत आहे. त्यामुळे मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ निर्णायक ठरेल. करिअरमध्ये मोठी संधी मिळेल. ऑफिसमध्ये मान-सन्मान वाढेल. नवी वाहन खरेदी किंवा मालमत्तेत गुंतवणूक यशस्वी होईल.
हे पण वाचा : गालावर खळी असलेल्या मुलींविषयी पुराणात काय म्हटलंय? सत्य ऐकून थक्क व्हाल!
कर्क राशीच्या लोकांना प्रेम जीवनात सकारात्मक वळण मिळेल. विद्यार्थी वर्गाला यश मिळेल. सरकारी नोकरीच्या तयारीत असलेल्या तरुणांसाठी ही संधीचं दार उघडेल.
सिंह राशीच्या लोकांसाठी शनीचा वक्री कालखंड मानसिक बळ आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. नेतृत्वगुण बळावतील. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना विशेष लाभ मिळेल. कोर्ट-कचेरीसारख्या विषयांमध्ये विजय मिळू शकतो.
