आज हवामानात मोठा बदल! पुण्यासाठी हवामान खात्याचा अलर्ट; जाणून घ्या आजचे अंदाज
Weather Update
Weather Update : राज्यात सलग काही दिवस सुरू असलेल्या पावसाच्या सरी आता ओसरताना दिसत आहेत. हवामान खात्याने आज, सोमवार १५ जुलैसाठी दिलेल्या अंदाजानुसार, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांत ढगाळ वातावरण राहणार असले तरी काही ठिकाणी पावसाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, कमाल तापमानही वाढू लागले असून उकाड्याने त्रस्त जनतेला पुन्हा उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत.
हे पण वाचा : सोन्याच्या भावात आज मोठी उसळी! १० ग्रॅम सोनं तब्बल ₹98,110; तुमच्या शहरात काय दर?
सातारा जिल्ह्यात मागील चोवीस तासांत सरासरी ६ मिमी पावसाची नोंद झाली असून, आज गडगडाटी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कमाल तापमान २९ अंश सेल्सिअसच्या आसपास राहणार असून आकाश ढगाळ असेल. गेल्या काही दिवसांत साताऱ्यात वातावरण बदलत असून नागरिकांनी बाहेर पडताना छत्रीचा वापर करावा, असा सल्लाही हवामान खात्याने दिला आहे.
पुण्याच्या शिवाजीनगर भागात केवळ ०.५ मिमी पावसाची नोंद झाली असून, तापमान २८.४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. पुणे शहरात हलकासा पाऊस आणि ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. घाटमाथ्याच्या भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोल्हापूरमध्येही पावसाचा जोर कमी झाला असून फक्त २ मिमी पाऊस नोंदविण्यात आला आहे. कमाल तापमान वाढत असून २७.४ अंश सेल्सिअसपासून ते २९ अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र हवामान खात्याने येथेही ढगाळ वातावरण आणि तुरळक गडगडाटी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
सोलापूर जिल्ह्यात पावसाची उघडीप कायम आहे. येथे मागील २४ तासांत पावसाचा मागमूसही नाही. कमाल तापमान ३३.४ अंशावर गेले असून पुढील चोवीस तासांत ते ३४ अंशांपर्यंत वाढू शकते. आकाश ढगाळ राहील, पण फारसा पाऊस अपेक्षित नाही. गरज असल्याशिवाय उन्हात बाहेर न पडण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.
सांगली जिल्ह्यात १ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आजच्या दिवशी ढगाळ वातावरण कायम राहील आणि हलक्याशा सरी कोसळू शकतात. कमाल तापमान ३१ अंश तर किमान तापमान २१ अंश राहण्याची शक्यता आहे.
