October 29, 2026

पुण्यातील टेकड्यांवरील राडारोड्यावर सरकारची मोठी कारवाई, वनमंत्र्यांचा दणदणीत निर्णय!

0
Pune Hill Encroachment

Pune Hill Encroachment

Pune Hill Encroachment : पुण्याच्या हिरव्या टेकड्यांवर बेकायदेशीर राडारोडा टाकून निसर्गाची होणारी हानी अखेर विधानभवनात पोहोचली आहे. शहरातील निसर्गवैभवाचा भाग असलेल्या या टेकड्या दिवसेंदिवस बांधकामांच्या राडारोड्याखाली गुदमरू लागल्या होत्या. याला चाप लावण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांनी सोमवारी मोठा निर्णय घेत, “टेकड्यांवरील माती काढू दिली जाणार नाही. राडारोडा टाकणाऱ्यांवर कारवाई केली जाईल,” असे स्पष्ट केले.

हे पण वाचा : आज हवामानात मोठा बदल! पुण्यासाठी हवामान खात्याचा अलर्ट; जाणून घ्या आजचे अंदाज

विधानमंडळात आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी या मुद्द्यावर आवाज उठवला. “पुण्याच्या टेकड्यांवर रात्रीच्या अंधारात बिनधास्तपणे ठेकेदारांकडून बांधकामाचा राडारोडा टाकण्यात येतो आहे. यामुळे फक्त पर्यावरणाचेच नव्हे, तर शहराच्या श्वासांचेही नुकसान होते आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी वन अधिकाऱ्यांकडून याबाबतचा सविस्तर अहवाल मागवण्याची मागणीही सरकारपुढे केली.

शहरातील बांधकामांमधून दररोज हजारो टन मलबा तयार होतो. या मलब्याच्या योग्य व्यवस्थापनाऐवजी तो थेट टेकड्यांवर टाकला जातो. यामुळे निसर्गाचा समतोल बिघडतो, भूजल साठे कमी होतात आणि जैवविविधतेवर मोठा परिणाम होतो. या गंभीर वास्तवाकडे सरकारचे लक्ष वेधून आमदार शिरोळे यांनी परिसरात वाढत्या अनधिकृत कचरा टाकणीच्या घटनांकडे बोट दाखवले.

यावर प्रतिसाद देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी कारवाईची ग्वाही दिली. “आता वन, पोलीस आणि महसूल विभाग एकत्र येऊन या परिसरांवर लक्ष ठेवतील. सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील आणि ज्या जमिनीवर राडारोडा टाकला जातो आहे, तिथे कठोर कारवाई केली जाईल,” असे त्यांनी जाहीर केले.

हे पण वाचा : सोन्याच्या भावात आज मोठी उसळी! १० ग्रॅम सोनं तब्बल ₹98,110; तुमच्या शहरात काय दर?

त्याचबरोबर शहरामध्ये राडारोडा विल्हेवाट व्यवस्थेसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. “ही यंत्रणा कार्यरत झाली की, मलबा टेकड्यांवर टाकण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही,” असे आश्वासनही त्यांनी दिले.

Leave a Reply