October 29, 2026

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! मासिक पगार ₹45,000; पुण्यात मेगाभरती जाहीर

0
Job Recruitment

Job Recruitment

Job Recruitment : पुणे विभागातील अनेक तरुणांसाठी दिलासादायक बातमी आहे. “स्वच्छ महाराष्ट्र अभियान” अंतर्गत विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत १३८ शहर समन्वयक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ४५,००० रुपये मासिक मानधनावर ही भरती होणार असून, पुणे विभागातील विविध नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये ही पदं भरली जाणार आहेत. सध्या बेरोजगार किंवा समाजहिताच्या कामात हातभार लावण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे.

हे पण वाचा : ओझी वाहणारा माथाडी कामगार बनला कोट्यवधींचा मालक! 200 कोटींच्या संपत्तीचं रहस्य नेमकं काय? वाचा सविस्तर

ही भरती पूर्णपणे कंत्राटी स्वरूपाची असून, नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर शहर समन्वयक म्हणून काम करण्याची जबाबदारी उमेदवारांवर असणार आहे. स्थानिक प्रशासनासोबत समन्वय साधत स्वच्छतेसंदर्भातील उपक्रमांची अंमलबजावणी, जनजागृती, नियमित पाहणी, अहवाल सादर करणे अशी कामांची रूपरेषा असेल.

भरती अंतर्गत ७४ पदं नगरपरिषदांसाठी आणि ६४ पदं नगरपंचायतींसाठी उपलब्ध आहेत. यामुळे एकूण १३८ उमेदवारांना कामाची संधी मिळणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरून या भरतीसाठी अर्ज करता येईल.

पात्रता काय?
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे बी.ई./बी.टेक., बी.आर्क., बी.प्लॅनिंग किंवा बी.एससी. (कोणत्याही शाखेतील) पदवी असावी लागेल. शिक्षणाबरोबरच स्थानिक प्रशासनासोबत काम करण्याची तयारी आणि सामाजिक बांधिलकीची जाण असणं आवश्यक मानलं जातंय.

वयोमर्यादा:
अर्जदाराचं वय ३५ वर्षांपर्यंत मर्यादित आहे.

हे पण वाचा : घरात सतत भांडणं होतायत? मग ‘हे’ झाड आजच घराबाहेर करा, वास्तुशास्त्राचा धोक्याचा इशारा!

महत्त्वाच्या तारखा:
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: २ जुलै २०२५
अर्ज करण्याची अंतिम तारीख: ८ जुलै २०२५

उमेदवारांनी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन भरतीची सविस्तर माहिती आणि जाहिरात वाचूनच अर्ज करावा. ही भरती पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार असून, स्थानिक तरुणांना नोकरीसोबत समाजहिताचे काम करण्याची दुहेरी संधी यातून मिळणार आहे.

 

Leave a Reply