October 31, 2026

₹13 लाखात परफॉर्मन्स, स्टाईल आणि फीचर्स; टाटाकडून Altroz Racer वर बंपर सूट

0
Punelive24 News

Tata Altroz Racer | भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये स्पोर्ट्स कार्सना फारसा प्रतिसाद मिळत नाही, परंतु टाटा मोटर्सने 2024 मध्ये काही वेगळं करून दाखवलं. टाटाने अल्ट्रोजच्या हॉट हॅच व्हर्जनसह “Altroz Racer” भारतीय बाजारात सादर केली, जी पॉवरफुल टर्बो पेट्रोल इंजिन, आकर्षक डिझाइन आणि प्रीमियम वैशिष्ट्यांसह सुसज्ज होती. परंतु याची अपेक्षित विक्री झाली नाही आणि त्यामुळे टाटा मोटर्स आता या मॉडेलवर मोठी सूट देत आहे.

टाटा अल्ट्रोज रेसर सध्या तब्बल ₹1.35 लाखांच्या सूटसह विकली जात आहे. यामध्ये ₹85,000 रोख सूट आणि ₹50,000 पर्यंतचा एक्सचेंज बोनस किंवा स्क्रॅपेज बोनस समाविष्ट आहे. ही ऑफर सध्या फक्त 2024 मॉडेल्ससाठी लागू आहे. अल्ट्रोज रेसरची ऑन-रोड मुंबई किंमत सध्या ₹11.01 लाख ते ₹12.94 लाख दरम्यान आहे.

परफॉर्मन्स-

अल्ट्रोज रेसर ही एक स्पोर्टी हॅचबॅक असून ती 1.2-लिटर टर्बो पेट्रोल इंजिनसह येते, जे 118 BHP आणि 170 Nm टॉर्क निर्माण करते. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले असून 0 ते 100 km/h स्पीड फक्त 11 सेकंदांपेक्षा कमी वेळेत गाठू शकते. ही परफॉर्मन्स या सेगमेंटमधील इतर कार्सच्या तुलनेत खूपच प्रभावी आहे.

कारमध्ये अनेक प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत – 10.25-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, स्पोर्टी एक्झॉस्ट साउंड, सनरूफ, डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर, आणि ड्रायव्हिंग डायनॅमिक्सही कमालीची आहेत. ही कार ट्रॅकवर चांगली कामगिरी करू शकते आणि शहरातील सामान्य रस्त्यांवरही उत्तम राइड क्वालिटी देते.

जर तुम्ही ₹13 लाखांच्या बजेटमध्ये एक स्पोर्टी कार घेण्याचा विचार करत असाल, तर ही सूट तुमच्यासाठी योग्य संधी ठरू शकते. भारतात याअगोदर इतक्या परफॉर्मन्स आणि फीचर्ससह अशी डील क्वचितच पाहायला मिळते. त्यामुळे अल्ट्रोज रेसर ही आता केवळ दुर्लक्षित नाही, तर एक ‘value for money’ पर्याय ठरू शकते.

Leave a Reply