मारुतीच्या दोन दमदार हायब्रिड SUV घालणार धुमाकूळ; मिळणार 35km पेक्षा जास्त मायलेज!
Maruti Fronx and Grand Vitara | भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये हायब्रिड गाड्यांची मागणी सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ग्राहक आता पारंपरिक पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांऐवजी पर्यावरणपूरक, किफायतशीर आणि अधिक मायलेज देणाऱ्या पर्यायांकडे वळत आहेत. याच पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने ग्राहकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. कंपनी 2025 मध्ये दोन नवीन हायब्रिड SUV गाड्या भारतीय बाजारात सादर करण्याच्या तयारीत आहे.
या दोन SUV म्हणजे मारुती सुझुकी Fronx Hybrid आणि Grand Vitara Hybrid. या दोन्ही गाड्या सध्या चाचणी प्रक्रियेत असून, 2025 च्या दुसऱ्या सहामाहीत म्हणजेच जून ते ऑगस्ट दरम्यान बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या SUV गाड्या फक्त मायलेजमध्येच नाही, तर फीचर्स आणि डिझाइनमध्ये देखील स्पर्धकांना टक्कर देतील.
Fronx Hybrid
Fronx Hybrid ही कंपनीची सर्वात लोकप्रिय SUV पैकी एक आहे आणि ती आता 1.2-लिटर 3-सिलेंडर पेट्रोल इंजिनसह हायब्रिड सिस्टमसह सादर केली जाणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही SUV एका लिटरमध्ये तब्बल 35 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कापण्यास सक्षम असेल. हायब्रिड तंत्रज्ञानामुळे ही गाडी केवळ इंधन कार्यक्षमच नाही तर प्रदूषण कमी करण्यातही मदत करेल.
Grand Vitara Hybrid
दुसरीकडे, Grand Vitara Hybrid ही 7-सीटर SUV असेल. ही कार देखील हायब्रिड पॉवरट्रेनसह येणार असून, तिची टेस्टिंग सध्या भारतीय रस्त्यांवर सुरु आहे. या गाडीबाबत अधिकृत तपशील अद्याप समोर आले नसले तरी, यात प्रीमियम इंटीरियर, प्रगत सेफ्टी फीचर्स आणि पॉवरफुल हायब्रिड इंजिन दिले जाण्याची शक्यता आहे. ग्रँड विटारा आधीपासूनच प्रीमियम SUV सेगमेंटमध्ये लोकप्रिय आहे आणि तिच्या हायब्रिड व्हर्जनमुळे ती आणखी मजबूत स्थान निर्माण करू शकते.
किंमत–
Fronx Hybrid ची अंदाजे किंमत ₹9 लाखांपासून सुरु होऊ शकते, तर Grand Vitara Hybrid ची किंमत ₹13 लाखांपासून सुरु होण्याची शक्यता आहे. मायलेज, परफॉर्मन्स आणि टिकाऊपणाच्या दृष्टीने पाहता या दोन्ही गाड्या ग्राहकांसाठी फायदेशीर ठरू शकतात. जर तुम्ही नवीन SUV घेण्याचा विचार करत असाल, तर 2025 मध्ये येणाऱ्या या दोन मारुती हायब्रिड SUV वर लक्ष ठेवणे फायदेशीर ठरेल.
